विशाल अगरवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुण्यात(pune) मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान कार चालवून तरुणीसह दोघांना चिरडणाऱ्या आरोपी बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच बिल्डर पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे. ‘पुण्यातील(pune) अपघातप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली. याशिवाय ही गाडी वितरित करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा’, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुलांना दारू उपलब्ध करून देणाऱ्या पब्जवर करावाई करण्याची मागणी मी आज केली आहे. जर कोणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे’, असे अंबादास दानवे पुढे म्हणाले.

कसा झाला होता अपघात?

बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने पुण्यात शनिवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास मित्रांसोबत हॉटेलमध्ये मद्यपान पार्टी केली. यानंतर आलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्याने जागीचा मृत्यू झाला. कारने फरफटत नेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बिल्डर विशाल अगरवाल यांना अटक केली आहे. तसेच पब मालकालाही अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

रेसिपी : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी अटक टाळली

सांगली हादरलं! प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह