कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या सात-आठ वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर नजीकच्या खुलताबाद येथील औरंगजेबाच थडग काहीजण अकारण उकरून काढत असतात. त्यामागे सामाजिक वातावरण प्रदूषित करायचं हा एकमेव हेतू संबंधितांचा असतो(history).

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांनी अचानक औरंगजेबाच गुणगान सुरू केलं. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, त्यांने आपल्या सीमा विस्तारल्या होत्या, त्याने भारतात हिंदूंची अनेक मंदिरे बांधली, त्यावेळी भारताचा जीडीपी 24 टक्क्यावर होता आणि म्हणूनच इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आले. अशी मुक्ताफळे अबू आझमी यांनी उधळल्यानंतर त्यांच्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली.
औरंगजेब हा अतिशय क्रूर होता. त्याबद्दलच्या अनेक कथा इतिहासातील(history) रुमालात वाचायला मिळतात. त्याने छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि भद्रकाली रणरागिणी ताराराणी यांना खूप त्रास दिला. इथला मुलुख आपल्या टाचेखाली आणण्यासाठी तो तब्बल 28 वर्षे महाराष्ट्रात उतरला होता. अखेर त्याचा मृत्यू आत्ताच्या अहिल्यानगर मध्ये झाला आणि दफन खुलताबाद येथे झाले. पण आता या औरंगजेबाचा वापर मराठ्यांना विशेषतः हिंदूंना डिवचण्यासाठी केला जातो आहे.
महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. ज्यांना इतिहास माहिती नाही, त्या मुस्लिम समाजातील काही तरुणांचा पडद्यामागे राहून काहीजण वापर करत असतात. मोबाईलवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवून ते व्हायरल करायचा उद्योग आजही चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी गरळ ओकण्याचा उद्योग नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांने केल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघालेले आहे. कोरटकर विरुद्ध राज्यभर संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अबू आझमी यांनी काहीही कारण नसताना अकलेचे तारे तोडले आहेत.

फार वर्षांपूर्वी याच महाशयांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात असेच अनुचित भाषण केले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील एका आमदाराने सदनांमध्ये कानाखाली आवाज काढला होता. त्यावेळी मनसेच्या आमदाराची ही कृती उत्स्फूर्त प्रतिक्रिया समजण्यात आली होती.शिवप्रेमींना डीवचण्याचा उद्योग यापूर्वी काही नेत्यांनी केले होते. वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात अशाच प्रकारे वातावरण गढूळ असताना औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली होती.
आणि त्यांनी त्याचे जोरदार समर्थनही केले होते. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही”औरंगजेब होता म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज(history) यांचे मोठेपण सिद्ध होते”अशा आशयाचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्याच दरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते हा वाद विनाकारण सुरू करण्यात आला होता. एकूणच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्यापासून आत्ताच्या अबू आझमी पर्यंत स्वतःचे राजकारण सोयीचे करण्यासाठी छत्रपती घराण्याला वापरले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, क्रूरकर्मा औरंगजेब याच्यावर स्तुती सुमने उधळल्यानंतर प्रसिद्धी मिळते यासाठी असे काही उद्योग आजही केले जात आहेत.
प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर, त्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन अभिवादन केल्यानंतर वातावरण शांत होणे अपेक्षित होते. पण आता त्याच्याकडे आठ ते दहा कोटी रुपये किमतीची रोल्स राईस ही आलिशान गाडी कशी आली? याची चौकशी ईडीने करावी अशी मागणी पुढे आली आहे. एकूणच हे प्रकरण तापवत ठेवले जात आहे असा त्याचा अर्थ होतो.
अबू आझमी म्हणजे भाजपाचा अघोषित आमदार अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे. त्याच्यावर राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गुन्हा दाखल करायचा किंवा नाही हे अधिकार राज्य शासनाचे आहेत आणि याच राज्य शासनाचे ते उपमुख्यमंत्री आहेत. वास्तविक त्यांच्याकडून मागणी होण्याच्या आधीच अबू आजमी यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते आणि आहे.
अबू आझमी यांच्याकडून झालेल्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. त्यानंतर अधिवेशन कालावधी असेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई किरकोळ स्वरूपाची असून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. कठोर कारवाई केल्याशिवाय अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करण्याचे धाडस कुणी करणार नाही.
हेही वाचा :
या रेसीपीचे नाव चिकन 65असे पडले जाणून घ्या मजेदार कथा आणि सोपी रेसिपी
दहावीच्या गणिताच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्याच्या अंतर्वस्त्रात सापडला मोबाईल अन्…
सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या