फ्लावर नहीं फायर है… केकेआरच्या रिंकू सिंगचा ‘पुष्पा-पुष्पा’ गाण्यावर जबरदस्त डान्स

सध्या आयपीएलची क्रेझ देशभरात बघायला मिळत आहे. आयपीएल सामन्यादरम्यानचे अनेक फोटो(dance) आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच रिंकू सिंगच्या जबरदस्त डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

केकेआर या टीमचा खेळाडू रिंकू सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ केकेआरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू हा मैदानावर अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटातील गाण्याची (dance)हुकस्टेप करताना दिसत आहे. “रॉकेट रिंकू, रुकेगा नहीं!”, असं कॅप्शन रिंकूच्या या डान्सच्या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला कमेंट करुन रिंकूच्या चाहत्यांनी त्याच्या डान्सचे कौतुक केलं आहे.

रिंकूच्या डान्सच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “लॉर्ड रिंकूचा जबरदस्त डान्स” तर दुसऱ्या युजरनं कमेंट केली, “पुष्पा फिवर”

काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 चित्रपटातील ‘पुष्पा-पुष्पा’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात अल्लू अर्जुन हटके डान्स स्टेप्स करताना दिसला. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले.

प्रेक्षक पुष्पा-2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना फहाद फाझील, जगदीश भंडारी, प्रकाश राज हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमारनं केलं आहे.

पुष्पा 2 या चित्रपटाचं बजेट 500 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटातील सहा मिनिटांचा एक सीन शूट करण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 60 कोटी खर्च केलं आहेत.

हेही वाचा :

कोल्हापुरात, तारेवरची नव्हे चक्क रस्त्यावरची कसरत!

क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये

धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair