मालदीवशी संबंध ताणले असले तरी ते पूर्ववत होण्यासाठी भारताला राजनैतिक (political)कौशल्य पणाला लावावे लागेल.
जागतिक राजकारणाचा (political)केंद्रबिंदू आखातातून आता हिंद-प्रशांत महासागराकडे सरकत आहे. विशेषतः चीनने आक्रमक रणनीती आखत लष्करी आणि विशेषतः सागरी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला आहे. दक्षिण-चीन समुद्रात बस्तान बसवले आहे. त्या पार्श्वभूमीवर मालदीवसारख्या सामरिकदृष्ट्या मोक्याच्या देशाचे महत्त्वही तितकेच आहे.
गेल्या वर्षाखेरीस मालदीवच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘इंडिया आउट’चा नारा देत, सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड न करण्याचा धोशा लावत ‘पीपल्स नॅशनल काँग्रेस’चे (पीएनसी) मोहम्मद मोईझ्झू अध्यक्षपदी निवडून आले. त्यावेळेपासून भारत आणि मालदीव यांच्या संबंधांत तणाव निर्माण झालेला आहे. तथापि, मालदीवच्या संसदेत, म्हणजेच ‘मजलीस’मध्ये बहुमताअभावी त्यांचे हात बांधले होते.
आश्वासने पूर्ण करायला आडकाठी होत होती. पण ‘मजलीस’च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोईझ्झू यांच्या ‘पीएनसी’ने जाहीर ८६पैकी ६६ जागा जिंकून सभागृहात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांच्याविरोधी, भारतधार्जिण्या ‘मालदीवन डेमोक्रॅटिक पक्षा’ला (एमडीपी) केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले.
मोईझ्झू यांनी पक्षांतरविरोधी कायदाही संमत करून घेतला आहे. भारताच्या दृष्टीने मालदीवमधील या घडामोडी महत्त्वाच्या आणि उभयतांच्या संबंधांवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या आहेत.विशेषतः ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमांतर्गत चीनने भारताभोवतीच्या पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश या शेजारील देशांत चंचूप्रवेश केला आहे. मालदीवही त्याला अपवाद नाही. त्यातच मोईझ्झूसारख्या राज्यकर्त्यांचा भारतद्वेष आणि चीनच्या कच्छपी लागण्याची रणनीती हेच त्यांच्या स्थानिक राजकारणाचे बलस्थान आहे. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी परंपरेनुसार भारताला भेट देणे अपेक्षित असताना चीनचा रस्ता धरला.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी गळाभेट घेत आपले चीनप्रेम व्यक्त केले. मुझ्झू यांनी सत्तेवर आल्यावर भारतविरोधी निर्णयांचा सपाटा लावला. विशेषतः व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच मालदीवला आपत्तीकाळात मदत म्हणून भारताने दोन हेलिकॉप्टर आणि विमान तैनात केले आहे. त्यासाठी नेमलेले लष्करी कर्मचारी काढून तेथे नागरी कर्मचाऱ्यांना नेमण्यासाठी येत्या दहा मेपर्यंत मुदत दिली आहे.
हेही वाचा :
विज्ञान-रंजन – खग्रास सूर्याचा ‘पाठलाग’
टीसमधील पीएचडी स्कॉलरला दोन वर्षांसाठी केले निलंबित;
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणपूरक वस्तूंचा घेऊ ध्यास