काँग्रेसचे(Congress) माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणी कपिलनगर परिसरात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे काल रात्री प्रचार सभा आटपून घरी जात होते. त्यावेळी नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला.
या घटनेची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपुस करण्यात आली. या अपघातात नितीन राऊत हे थोडक्यात बचावले आहेत. ते एकदम सुखरूप असून कारला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.
दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे काँग्रेस(Congress) नेते व विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेके व अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा :
सासरा सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करायचा बळजबरी, जाणून घ्या हायकोर्टाने काय म्हटलं?
नोव्हेंबरमध्ये वैष्णोदेवी दर्शनाचा प्लॅन करताय? भारतीय रेल्वे देतेय संधी
50 लाख दे नाहीतर…; शाहरुख, सलमाननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी