येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी(association) २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यातून २०२४-२५ या वर्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आतापर्यंत २८ वकिलांनी अर्ज खरेदी केले असून त्यापैकी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूर : येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यातून २०२४-२५ या वर्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आतापर्यंत २८ वकिलांनी अर्ज खरेदी केले असून त्यापैकी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(association) विद्यमान अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.
सोलापूर बार असोसिएशएनसाठी यंदाच्या निवडणुकीत एक हजार ८३१ वकील सदस्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली होती. यंदाची निवडणूक चौरंगी होणार असल्याने अर्जांची संख्या देखील वाढू शकते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ॲड. एस.व्ही. उजळंबे, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. अमित आळंगे व ॲड. एस.आर. रेशमे या चौघांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यात ॲड. आळंगे व ॲड. उजळंबे यांच्यात कांटे की टक्कर होवू शकते, असे बोलले जात आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन १ मे रोजी होणार असून त्यासाठी उच्च न्यायालयाचे चार न्यायमुर्ती येणार आहेत. त्यामुळे बार असोसिएशन निवडणुकीची मतमोजणी २९ एप्रिलऐवजी २ मे रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ ३ किंवा ४ मे रोजी होईल, असेही सांगितले जात आहे.
हेही वाचा :
मुद्दा – फाटक्या कपड्यांची फॅशन
समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू,
YouTube आणि Instagram वर सर्वात पहिला व्हिडिओ