राज्याच्या 44.93% जमिनीवर वाळवंटीकरणाचे संकट : इस्रो, एसएसी

महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे(desertification). हवामान बदलामुळे राज्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
वाळवंटीकरणाचं आव्हानंही महाराष्ट्रासमोर आहे. याविषयी इस्रोनं 2017 मध्ये इशाराही दिला होता. ती बातमी पुन्हा शेयर करत आहोत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये क्षारपड जमिनीची समस्या आ वासून उभी आहे. तर काही जिल्हे सातत्यानं दुष्काळाचा सामना करत असतात. पण ही सारी लक्षणं एका मोठ्या संकटाची आहेत. हे संकट म्हणजे वाळवंटीकरणाचं(desertification).
होय, महाराष्ट्राचा वाळवंट होतोय. थोड्याथोडक्या नव्हे, तर राज्याच्या तब्बल 44.93 टक्के क्षेत्रावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया किंवा जमिनीची धूप सुरू आहे. ही माहिती ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)’ आणि ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. हा अहवाल 17 जून 2016 ला प्रकाशित झाला आहे. यामध्ये देशाची आणि प्रत्येक राज्यातील वाळवंटीकरणाची(desertification) स्थिती दाखवण्यात आली आहे.
2003-2005 ते 2011-2013 या कालावधीचा आढावा आहे. ‘डेझर्टीफिकेशन स्टेटस मॅपिंग ऑफ इंडिया’ या नावानं हा अभ्यास करण्यात आला आहे. शुष्क, अर्धशुष्क आणि कोरड्या-अर्ध दमट परिस्थितीत मानवी हस्तक्षेप आणि नैसर्गिक कारणांमुळे सातत्यानं होणारी जमिनीची धूप म्हणजे वाळवंटीकरण(desertification) होय. देशात फार मोठ्या क्षेत्रावर वाळवंटीकरण होत आहे. देशाच्या वाळवंटीकरणात राजस्थानचा सर्वाधिक वाटा आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्पेस अॅप्लिकेशन सेंटरची भूमिका
अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी ‘बीबीसी मराठी’शी या विषयी संवाद साधला. ते म्हणाले, “हा अहवाल बनवताना विविध संस्थांची भूमिका ही विचारात घेतली आहे. प्रत्येक संस्थेचं या विषयासंदर्भातील आकलन वेगवेगळं आहे. पण या अहवालात या सर्वांचा सुसंवाद आहे. यासाठी सॅटेलाईट डेटा वापरण्यात आला आहे.”
मिश्रा म्हणाले, “जमिनीची धूप आणि वाळवंटीकरण अशा दोन संज्ञा आहेत. पश्चिम गुजरातबद्दल बोलताना वाळवंटीकरण ही संज्ञा लागू पडते, तर दक्षिण गुजरातबद्दल जमिनीची धूप ही संज्ञा लागू पडते.”
तीन ऋतूंमधील परिस्थितीचा अभ्यास
“एखाद्या भागावर शेती असेल आणि अशा ठिकाणी पूर्वी 3 पिकं घेतली जात असतील आणि आता तिथं फक्त 2 पिकं घेता येत असतील तर त्या जमिनीची सुपिकता कमी झाली आहे,” असं ते म्हणाले. अशा प्रकारच्या जमिनीच्या धूपचीही दखल घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, जमिनीची ही धूप नेमकी का होते, याची कारणेही या अहवालात दिली आहेत. मिश्रा म्हणाले, “पण मला वाटते, आकडेवारीपेक्षाही कारणं आम्ही दिली आहेत, ती अधिक महत्त्वाची आहे. या कारणांच्या आधारे या समस्येवर उपाययोजना करणं शक्य होईल.”
या समस्येचा शास्त्रीय आधार या अहवालानं दिला आहे. या समस्येची एक विस्तृत समज येण्यासाठी. या अहवालाचा अभ्यासाचा उपयोग होईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “तीन ऋतुंमधील आकडेवारीचा समावेश यात करण्यात आलेला आहे.”
महाराष्ट्रातील स्थिती
या अभ्यासानुसार महाराष्ट्राच्या 1,38,25,935 हेक्टर एवढ्या मोठ्या भूभागाचं वाळवंटीकरण होत आहे. हे प्रमाण महाराष्ट्राच्या एकूण भूभागाच्या 44.93 टक्के इतकं आहे.
Smart News:-
Mumbai Indians विरुद्ध स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरणार Rajasthan Royals…
ईडीचा शाओमीला खूप मोठा दणका! तब्बल 5500 कोटींची संपत्ती जप्त
विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन
Yes Bank आणि DHFL घोटाळा प्रकरणी CBIची छापेमारी
‘द्वेशाचं राजकारण’ प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण