1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या!

general knowledge – कित्येकदा इतरांचे पाहूनच आपण विविध शब्दांचा वापर करु लागतो, किंवा तो शब्द बोलण्यास सुरुवात करतो. असाच शब्द म्हणजे ‘K’. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की हजार ऐवजी K वापरला जातो. युट्यूबर्स, इन्स्टाग्रामर्स याचा बराच वापर करताना दिसतात. पण, या K चा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर आज करूयात.
K मागचं सिक्रेट काय आहे? : ग्रीक शब्द ‘Chilioi’ म्हणजे हजार. असं म्हटलं जातं की हा K तिथूनच जन्माला आला. तेव्हापासूनच हजारऐवजी फक्त K वरच निभावलं जाऊ लागलं.
बायबल या धर्मग्रंथामध्येही K चाच उल्लेख आहे. ‘Chilioi’ या ग्रीक शब्दाचा वापर जेव्हा फ्रेंच भाषेत करण्यात आला तेव्हा याचा अर्थ किलोग्रॅम असा झाला.कोणत्याही गोष्टीला हजारने गुणिले केल्यास येणारं परिमाण किलोमध्ये (general knowledge) असतं.
जसं, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर.इंग्रजीत हा शब्द लिहिताना त्याची सुरुवात K नं होते. हे हजाराचं प्रतीक मानलं जातं. ज्यामुळं आपण हजार ऐवजी K लिहिण्यावर भर देतो.
हेही वाचा :