तुमचं आधार अपडेट आहे ना? नसेल तर Update कसं करायचं? उत्तर इथे मिळेल!

Adhaar card

‘राज ठाकरेंचं समर्थन भाजपला महागात पडेल’; केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला

आधार कार्ड (Adhaar card) प्रत्येक बाबीसाठी महत्वपूर्ण मानलं जातं. सरकारी असो वा खासगी प्रत्येक कामासाठी आधारची माहिती अनिवार्य ठरते. सरकारी कामकाजात आधारचं(Adhaar card) महत्व अन्य कागदपत्रांच्या तुलनेत अधिक मानलं जातं. नवजात बालक ते ज्येष्ठ नागरिक कुणालाही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आधार शिवाय प्रस्ताव मार्गी लागत नाही.

सरकारी पातळीवर मतदार यादीला आधार संलग्नित करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला आहे. निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, बँक व्यवहार, विमा, कर प्रस्ताव आदी कामासाठी आधार अनिवार्य ठरते. तुमची महत्वाची कामं वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्यास आधार(Adhaar card) वेळोवेळी अपडेट असणं महत्वाच आहे. तुम्ही विहित वेळेतच आधार अपडेट  असल्याची माहिती घ्या आणि नसल्यास तत्काळ अपडेट करण्यास प्राधान्य द्या.

डेमोग्राफित ते बायोमेट्रिक:

आधारमध्ये दोन प्रकारे माहिती संकलित केली जाते. डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक. डेमोग्राफिक माहितीत नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल नंबर, नातेसंबंध, माहिती सादर करण्यास पूर्वसंमती यांचा समावेश होतो. तुम्हाला वरील कोणत्याही माहितीत बदल अपेक्षित असल्यास तत्काळ आधार(Adhaar card) अपडेट करा. बायोमेट्रिक माहितीत बुबुळे, हातांचे ठसे, चेहरा आदी बाबींचा अंतर्भाव होतो. नेमकी आधारची माहिती केव्हा अपडेट करावी हे जाणून घेणं तितकंच महत्वाचे आहे.

कर्तव्य आधार ‘अपडेट’चं:

विवाहानंतर महिलेच्या घराच्या पत्त्यात बदल होतो. नाव तसेच आडनाव यामध्येही बदल होतो. अशा स्थितीत आधार अपडेट रणे महत्वाचे ठरते. पतीच्या नावानुसार आडनावातील बदल महत्वाचा ठरू शकतो. लग्नानंतर पत्त्यामध्ये देखील बदल होतो. त्यामुळे पत्त्यात अपडेट केल्यामुळे कागदपत्रांच्या प्रक्रियेत होणारा व्यत्यय टाळता येतो.

आधार त्रुटी-

आधार(Adhaar card) बनविताना नकळतपणे त्रुटी असल्यास वेळेवर दुरुस्त करणे अत्यंत महत्वाचं आहे. जन्मतारीख चुकीची छापली जाऊ शकते. त्यामुळे आधार मध्ये कोणतीही माहिती चुकीची असल्यास तत्काळ दुरुस्त करा.

बायोमेट्रिक्स अपडेट-

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, बालकाचे वय पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रित माहिती प्रदान करण्याद्वारे त्याची मोंदणी केली जाणे आवश्यक ठरते. बालकांच्या बाबतीत समान आधार क्रमांकावर माहिती अद्ययावत केली जाते. फिंगरप्रिंट धूसर होण्यामुळे पूर्ण क्षमतेने स्कॅन होत नाही. त्यामुळे कार्डधारकाने बायोमेट्रिक डाटा विहित वेळेतच अपडेट करायला हवा.

Smart News:-

“राज ठाकरेंची हिंदुत्वाची शाल नवी की जुनी?”; फडणवीस म्हणाले, “हे काळच ठरवेल.”


“भोंगा महत्त्वाचा की महागाई?”; सुप्रिया सुळेंचे राज ठाकरेंवर टीकास्त्र


राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उदगीर सज्ज; 95 व्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण


प्रज्वल चौगुलेच्या क्लिकचं अॅपलकडून कौतुक, टॉप 10 फोटोग्राफरच्या यादीत निवड


कोल्हापूर: चांगले काम करा; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत – अजित पवार


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *