फक्त एकदा पैसे भरा आणि दरमहा घ्या 12 हजार रूपये पेन्शन

Retirement Life

सेवानिवृत्तीनंतरचं जीवन (Retirement Life) सुखमय असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण विविध माध्यमांमधून बचत (Saving) करत असतो. सध्या बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सरकारी, सहकारी बॅंका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्यानं नवनवीन बचत योजना आणत असतात. सेवानिवृत्तीनंतर(Retirement Life) सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन अर्थात निवृत्तीवेतनाचा (Pension) आधार असतो. पण खासगी क्षेत्रातील नोकरदारांना पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन 60 वर्षानंतर पेन्शन पद्धतीने म्हणजे दरमहा ठराविक रक्कम मिळावी या हेतूने गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत.

पण जर तुम्हाला वयाच्या 40 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागली तर? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण आता हे शक्य आहे. एलआयसीनं (LIC) अशीच एक योजना लॉंच केली आहे.

सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) असं तिचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळू शकते. `नवभारत टाईम्स`नं ही बातमी दिली आहे.

 काय आहे योजना? देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीनं (LIC) सरल पेन्शन योजना ग्राहकांसाठी आणली आहे.

या योजनेतून ग्राहकांना वयाच्या 40 वर्षांपासून पेन्शनचा लाभ मिळू शकतो. ही योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम आणि वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. तुम्ही या योजनेचा एकटे किंवा तुमच्या जोडीदारासोबत लाभ घेऊ शकता.

योजनेत तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहील. सुरुवातीला जितक्या रकमेची पेन्शन मिळेल, तीच रक्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहणार आहे. या योजनेसाठी किमान वय 40 वर्षं आणि कमाल वय 80 वर्षं अशी वयोमर्यादा आहे. ही पॉलिसी सुरू झाल्यावर तुम्ही ती सहा महिन्यांनंतर सरेंडर करू सकता.

या पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. पॉलिसी घेतल्यानंतर सहा महिन्यांनी ग्राहक कर्जासाठी अर्ज करू शकतात. समजा एखाद्या आजाराच्या उपचारांसाठी तुम्हाला पैशांची गरज भासली तर तुम्ही पॉलिसीत जमा रक्कम परत मिळवू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, ग्राहकाला मूळ किमतीच्या 95 टक्के रक्कम परत मिळते.

एलआयसी सरल पेन्शन योजनेचा लाभ सिंगल लाईफ आणि जॉईंट लाईफ या दोन्ही पद्धतीनं मिळू शकतो. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असते. पॉलिसीधारकाला या योजनेअंतर्गत आयुष्यभर पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या वारसदाराला परत केली जाते.

जॉईंट लाईफ या प्रकारात पती आणि पत्नी अशा दोघांना एकाचवेळी पेन्शन मिळू शकते. प्राथमिक पेन्शनधारक हयात आहे, तोपर्यंत त्याला या पॉलिसीच्या माध्यमातून पेन्शन मिळत राहते. परंतु, प्राथमिक पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळते. जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर बेस प्रीमियमची रक्कम वारसदाराला दिली जाते.

PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस एलआयसी सरल पेन्शन योजनेतून पेन्शन मिळवण्यासाठी चार पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. या योजनेतून मासिक पेन्शन किमान 1000 रुपये, तिमाही पेन्शन किमान 3000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6000 रुपये तर वार्षिक पेन्शन किमान 12,000 रुपये मिळेल. या योजनेत पेन्शनच्या कमाल रकमेला कोणतीही मर्यादा नाही. उदाहरणार्थ, जर तुमचं वय 42 वर्ष आहे आणि तुम्ही 30 लाख रुपयांची अ‍ॅन्युईटी खरेदी केली तर तुम्हाला 12,388 रुपये मासिक पेन्शन मिळेल. एकूणच एलआयसीची सरल पेन्शन योजना ग्राहकांसाठी लाभदायक ठरणारी आहे.

Smart News:-

चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितला वाढीव वेळ


विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


महापूराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज: डॉ. प्रदीप ठेंगल


Leave a Reply

Your email address will not be published.