भयंकर आहे हे बेट! तिथं जाणाऱ्यांना जडतात जीवघेणे आजार

testing

एकेकाळी होतं जैविक शस्त्रांच्या चाचणीचं केंद्र…

जगात आजही अशी अनेक ठिकाणं आहेत, जी खूपच भयानक आणि प्राणघातक मानली जातात. लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात कारण तेथे गेल्यानंतर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.(testing biological weapons)

अशीच एक जागा उझबेकिस्तानमध्ये आहे. हे ठिकाण एकेकाळी जैविक शस्त्रांच्या चाचणीचं केंद्र (testing biological weapons) होते, परंतु आता येथे माणूस नावालाही नाही. हे ठिकाण जितकं आश्‍चर्यकारक आहे, तितकाच या ठिकाणाचा इतिहास जाणून घेतल्यास आणखी आश्चर्य वाटेल. 1920 मध्ये, सोव्हिएत युनियनने अशी जागा शोधण्यास सुरुवात केली, जिथे ते भयानक शस्त्रास्त्रांची चाचणी करू शकतील.

ही शस्त्रं प्रामुख्यानं जैविक शस्त्रं(testing biological weapons) होती. त्यामुळे लोकांपासून दूर असलेल्या निर्जन ठिकाणी या जागेचा शोध सुरू होता. हे ठिकाण सध्याच्या उझबेकिस्तानजवळ अरल समुद्रात वोझरोझदेनिया नावाच्या बेटावर सापडले. हे ठिकाण जगातील सर्वात मोठे जैविक शस्त्रांचे वॉरफेयर म्हणून प्रसिद्ध झालं.

जैविक शस्त्रांच्या चाचणीचं होतं केंद्र येथे 1948 मध्ये, सोव्हिएत युनियनने जैविक शस्त्रे बनवण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी Aralsk-7 नावाची गुप्तचर प्रयोगशाळा स्थापन केली. सन 1990 मध्ये ती बंद होण्यापूर्वी विविध रोग आणि जैविक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण करण्यात येत होते. यापैकी बरेच प्रयोग तर मानवासाठी प्राणघातक होते. प्लेग, अँथ्रॅक्स, चेचक, ब्रुसेलोसिस, टुलेरेमिया, बोट्युलिनम, एन्सेफलायटीस इत्यादी रोगांच्या चाचण्या येथे करण्यात आल्या होत्या.(testing biological weapons)

हे 6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं माकडांवर प्रयोग करण्यात आले अॅम्युझिंग प्लॅनेट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सोव्हिएत आर्मीचे सेवानिवृत्त कर्नल आणि मायक्रोबायोलॉजिस्ट गेनाडी लेप्योश्किन (Gennadi Lepyoshkin) यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी, बोलताना या ठिकाणासंबंधी अनेक प्रकारची माहिती दिली. 18 वर्षे येथे काम केल्याचे त्यांनी सांगितले होते. दरवर्षी 200 ते 300 माकडांवर येथे विविध आजारांच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. या आजारांचे जंतू सापडलेल्या पिंजऱ्यात त्यांना नेण्यात यायचे आणि त्यानंतर रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेण्यात आले.

या प्रयोगात ही सर्व माकडे काही आठवड्यात मरायची. हे पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करायला सांगणारी कोण आहे रशियन महिला? हे जगातील सर्वात प्राणघातक ठिकाण का मानलं जातं मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व जैविक शस्त्रे कालांतराने नष्ट झाली, परंतु अनेक शतकं जमिनीत अॅन्थ्रॅक्स शिल्लक राहतो आणि आता शास्त्रज्ञांचा दावा आहे की, आजही इथल्या जमिनीत अॅन्थ्रॅक्सचं प्रमाण प्रचंड आहे. अशा स्थितीत इथं कोणी गेल्यास त्याचा मृत्यू निश्चित आहे. आता अरल समुद्र पूर्णपणे कोरडा झाला असून हे ठिकाण वाळवंटात रुपांतरित झालं आहे. येथील तापमान 60 अंश सेल्सिअस पर्यंत असते. अशा स्थितीत इतक्या गरम वातावरणात या ठिकाणी कुणालाही जिवंत राहणं जवळपास अशक्य आहे.

Smart News:-

‘मी आंबेडकरांचा भक्त, अंधभक्त नाही’ मुख्यमंत्री ठाकरेंचा रोख कुणाकडे?


“सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोविड काळात 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला”


हनी ट्रॅप एक सायबर हल्ला …..


महाराष्ट्रात लोडशेडिंग होणार नाही? केंद्राकडून मुबलक प्रमाणात कोळसा पुरवठा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *