सोने-चांदीने नरमाईचा सूर आळवला होता. तर आता सोन्याने मोठी (gold and silver prices)भरारी घेतली आहे. तर चांदी उतरली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक धोरण पाहता, मौल्यवान धातुच्या किंमतीत लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे पत्नीसाठी क्रिप्टो करन्सीवर मेहरबान दिसू शकतात. तर शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांसाठी मदत करू शकतात. त्यातच कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यास दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी घसरण दिसू शकते.

आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. गेल्या आठवड्यात सोने 2500 रुपयांनी वधारले तर 500 रुपयांनी उतरले. सोमवारी सोन्याच्या किंमतीत 440 रुपयांची घसरण झाली होती. तर दुसर्याच दिवशी सोने 115 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 78,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 85,350 रुपये प्रति 10 ग्रॅम (gold and silver prices)आहे.जानेवारीच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची भरारी घेतली. सोमवारी किंमती स्थिर होत्या. 4 फेब्रुवारी रोजी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,500 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार IBJA 24 कॅरेट सोने 83,010, 23 कॅरेट 82,678, 22 कॅरेट सोने 76,037 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 62,258 रुपये, 14 कॅरेट सोने 48,561 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,793 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह ८६ हजार १०८ रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर 97 हजार रुपयांवर गेले आहेत. ट्रम्प सरकार अवलंबत असलेल्या धोरणाचे आंतरराष्ट्रीय जगतावर पडसाद उमटत आहेत. त्यामुळे जळगाव च्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सलग सहा दिवसांपासून सोन्याचे दर दररोज उच्चांकी दर पातळी गाठत आहे.सुवर्णनगरीत सोने पुढील आठवड्यात आणखी दीड हजाराने महागण्याचे संकेत असून 90 हजारांचा आकडा पार करेल अशी शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे (gold and silver prices)शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन IBJA हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत