NIA मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; किती मिळेल पगार..

तुम्ही सरकारी (govt) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (NIA) रिक्त जागांसाठी भरली निघाली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे. असे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण या पदांसाठीची पात्रता, अर्ज करण्याची शेवटची मुदत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

किती आहे पदसंख्या?

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या भरतीमध्ये प्रामुख्याने निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या एकूण 114 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठीचे अर्ज हे केवळ ऑनलाइनसह ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीय (govt) तपास यंत्रणेच्या अधिकृत संकेतस्थळ nia.gov.in ला भेट द्यायची आहे.

काय आहेत शेवटची मुदत?

राष्ट्रीय तपास संस्थेच्या या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होत आहेत. याशिवाय अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२४ असणार आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन उमेदवारांना केले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 114 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये 50 पदे निरीक्षकांची तर 64 पदे हे उपनिरीक्षकाची भरली जाणार आहे.

काय आहे पात्रता?

निरीक्षक आणि उपनिरीक्षक दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच त्याला या क्षेत्रातील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयाच्या 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

कशी असेल निवड प्रक्रिया?

वरील दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड होण्यासाठी कोणत्याही परीक्षेला बसण्याची गरज नाही, तर त्यांची निवड कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. याशिवाय उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे, त्यांचे गुण आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाच्या आधारे निवड केली जाईल.

ऑफलाइन अर्ज सादर करावा लागणार?

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना (govt) या पदासाठी ऑफलाइन देखील अर्ज सादर करावा लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून, तो पुढील पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. हा अर्ज प्रामुख्याने शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने पोहोचला पाहिजे. अशा पद्धतीने उमेदवारांना वेळेत पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : एसपी (प्रशासन), जिल्हा मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली 11003.

किती मिळणार पगार?

वरील दोन्ही पदांसाठी निवड झाल्यानंतर पगार वेगवेगळा असणार आहे. यामध्ये निरीक्षक पदासाठी 34,800 रुपये प्रति महिना तर उपनिरीक्षक पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. अधिक माहितीसाठी nia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.