सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात भरती

आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची(health department) बातमी आहे. बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने आरोग्या विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी भरती करणार आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. ही अर्जप्रक्रिया २५ जूनपासून सुरु होणार आहे.

BPSC च्या भरतीसामध्ये एकूण १३९९ पदे(health department) भरली जाणार आहे. या पदांसाठी तुम्ही २६ जुलै किंवा त्यापूर्वी अर्ज करु शकतात. या जागांसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा आहे. अनारक्षित प्रवर्गातील म्हणजे सामान्य प्रवर्गातील लोकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. मागासवर्गीय गटातील (पुरुष आणि महिला)साठी ४८ वर्ष वयोमर्यादा आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा आहे. तर बिहारच्या राज्य आरोग्य सेवा अंतर्गत कार्यरत डॉक्टरांसाठी वयोमर्यादा ५० वर्ष आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्ग, OBCआणि EWS श्रेणीसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २२५ रुपये आहे.

BPSC अंतर्गत पदांसाठी निवडलेल्या उमेदवाराला १५६०० ते ३९,१०० रुपये पगार दिला जाईल. याची माहिती अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.

हेही वाचा :

7 जुलैपर्यंत ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन…

विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत दोन्ही खासदारांकडून अपेक्षा

कोल्हापुर पोलिस ऍक्शन मोडवर; Reels चा नाद पडेल भारी, करावी लागेल पाेलिस ठाण्याची वारी…