गुड न्यूज! सोन्याच्या दरात घसरण…

सोन्याच्या(Gold prices) दरात सातत्याने होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला असून, शुक्रवारी (21 फेब्रुवारी 2025) दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.

24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 100 ग्रॅम 290 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 100 ग्रॅम सोन्याचा दर 8,80,400 रुपयांवरून 8,77,500 रुपयांवर आला आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 87,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरात(Gold prices) प्रति 100 ग्रॅम 450 रुपयांची घसरण झाली, ज्यामुळे 100 ग्रॅम सोन्याचा दर 8,07,000 रुपयांवरून 8,02,500 रुपयांवर आला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 450 रुपयांनी घसरून 80,700 रुपयांवरून 80,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 100 ग्रॅम 3700 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 100 ग्रॅम सोन्याचा दर 6,60,300 रुपयांवरून 6,56,600 रुपयांवर आला आहे. तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 370 रुपयांनी घसरून 66,030 रुपयांवरून 65,660 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घसरण झाली असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दलच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले असल्याने गुरुवारी सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

हेही वाचा :

पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले ‘फ्लाइंग किस’?

पोलीस उपनिरीक्षकाकडून पत्नीचा भररस्त्यात छळ, व्हिडीओ व्हायरल

लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी; आठवा हफ्ता आजपासून खात्यात जमा होणार