राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली(news) आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अनेकदा तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. यामुळे महिलांना योजनेसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म(news) भरण्यासाठी नारी शक्तीदूत अॅप सुरू केले आहे. मात्र, या अॅपवर अनेकदा सर्व्हर डाऊन, जास्त लोकांना एकाचवेळी अर्ज भरल्यामुळे संकेतस्थळ बंद होण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचसाठी आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.
या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे. तुम्हाला या वेबसाइटवर गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील. तर त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाइन पद्धतीने या वेबसाइच्या माध्यमातून करु शकणार आहात.
हेही वाचा :
विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा…
टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला 50 लाख बक्षिस दिलं
बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडताच अरमान मलिकची मोठी खरेदी, मुंबईमध्ये आलिशान घराची घेतली मालकी