उशिराने कार्यलयात येणाऱ्या सरकारी बाबूंना चाप बसवण्यासाठी केंद्र (center) सरकारने नवा नियम आणलाय. प्रत्येक कार्यालयाच्या गेटवर बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. या नव्या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर यावं लागणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सकाळी ९: १५ वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणं आवश्यक आहे.
लेट लतिफांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला (center). बायोमेट्रिकमुळे कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना आता ९:१५ वाजेपर्यंत कार्यालयात यावे लागणार आहे. कर्मचारी जास्तीत जास्त १५ मिनीट उशिराने येऊ शकतात. जर कर्मचारी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळाने उशिराने आले तर त्यांचा अर्ध्या दिवासांची रजा लावली जाणार असल्याने त्यांना अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाईल,अशा इशारा देण्यात आलाय. चार वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या उद्रेकानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणाली वापरणे बंद केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ही प्रणाली सुरू करण्यात आलीय.
जर कर्मचारी एखाद्या दिवशी कामावर हजर राहू शकला नाही तर त्याला कॅज्युअल रजेच्या अर्ज द्यावा लागेल. शासकीय (center) कर्मचारी उशीरा येतात तर काही जण लवकर वेळेआधी निघून जातात, अशा कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सरकारने ही प्रणाली सुरू केलीय. केंद्र सरकारची कार्यालये साधारणपणे सकाळी ९ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काम करतात. पण कर्मचारी लवकर निघून जात असल्याने लोकांची गैरसोय होत असते.
दरम्यान सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या प्रणाली विरोध केलाय. कार्यालयीन वेळ निश्चित नाहीये. ते सहसा संध्याकाळी ७ नंतर निघून जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेकवेळा आम्ही घरातून काम करतो. कामाचे तास निश्चित नाहीये. बहुतेक वेळा सुट्टी असतानाही कामे करावी लागत असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप
सांगलीतील पराभवावरुन भाजपचे चिंतन; कार्यकर्त्यांनी आवळला नाराजीचा सूर
मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले…