गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तथा गोविंदाची भाची आरती सिंह ही सध्या(social media) आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. नवऱ्यासोबत टी हनीमूनला गेली आहे. अशात तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी आता धुमाकूळ घातला आहे. आरतीने नवऱ्यासोबत लिपलॉक करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच लग्न(social media) केले आहे.तिने व्यावसायिक दीपक चौहान याच्यासोबत लग्नगाठ बांधली.त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मागे व्हायरल झाले होते. अशात ति नवऱ्यासोबत दुसऱ्यांदा हनीमूनला गेली होती. काल रविवारी तिने फ्रेंडशिप डे देखील सेलिब्रेट केला.

आरती सिंह ही सतत पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. अशात तिने या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत.आता आरती सिंह हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

फोटो पोस्ट करताना आरतीने त्याला छानसे कॅप्शन देखील दिले आहे. ‘नेहमी माझा मित्र राहणाऱ्या माझ्या नवऱ्याला हॅप्पी फ्रेंडशिप डे’, असं कॅप्शन आरतीने दिलं आहे. तिने नवऱ्यासाठी एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे.

“तु मला माझं बालपण पुन्हा जगू दिलंस. तुझ्यासोबत असताना मला लहान मुलांसारखं वाटतं. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’, अशी पोस्ट आरतीने दीपकसाठी लिहिली आहे. त्यावर दीपकने एक हार्ट इमोजी टाकली आहे. दोघेही या फोटोमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.

हेही वाचा :

मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस : प्रकाश आंबेडकर

Whatsapp वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचं! 35 स्मार्टफोनमध्ये बंद होणार व्हॉट्सॲप

‘तुझं लग्न कधी होणार?’ प्रश्नाने झाला हैराण, अखेर शेजाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल