जगप्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रा उत्सवाची(festival)भव्य सुरुवात झाली आहे. लाखो भक्तांनी पुरीच्या रथ यात्रा उत्सवात भाग घेतला असून, श्रद्धेचा समुद्र उसळला आहे.
जगन्नाथ मंदिरात सकाळी मंगलआरतीनंतर रथयात्रा सुरुवात झाली. प्रभु जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे तीन भव्य रथ सजवले गेले असून, भक्तांनी त्या रथांना ओढण्याची परंपरा निभावली. ‘हरि बोल’ आणि ‘जय जगन्नाथ’ या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले आहे.
उत्सवाच्या निमित्ताने पुरी शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे आणि बस सेवा चालविण्यात आली आहे. यासह सुरक्षा व्यवस्थेतही अधिक तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
जगन्नाथ रथ यात्रा उत्सव हा आस्थेचा आणि श्रद्धेचा प्रतीक आहे, जो हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा पाहता, हा उत्सव यंदाही अत्यंत भव्य आणि मंगलमय वातावरणात साजरा होईल यात शंका नाही.
हेही वाचा :
” PNB बँकला RBI ने १.३१ कोटींचा दंड लागू केला; काय असेल कारण…”
विनोद तावडे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर ?; डिसेंबरमध्ये नवीन अध्यक्षाची घोषणा
कतरिनाच्या प्रेग्नंसीवर विकीचं स्पष्टीकरण, म्हणाला…