जीएसटी (GST)नेटवर्क पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे, देशभरातील व्यावसायिकांना जीएसटीआर-१ रिटर्न भरता येत नाहीत. GSTR-1 दाखल करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०२५ म्हणजेच उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. मात्र त्याचपूर्वी त्यापूर्वी फायलिंग पूर्ण करण्यापूर्वी अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेकांना लॉगीन देखील करता येत नव्हतं. गुरुवारपासून जीएसटीच्या पोर्टलला अडचणी असल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर, GSTN ने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाला तारीख वाढवण्याची विनंती केली आहे. GSTR-1 दाखल करण्यास विलंब झाल्यास GSTR-2B निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे खरेदीदारांना इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा करण्यात अडचणी येऊ शकतात.
आयटीसीमध्ये विलंब झाल्यास कंपन्यांच्या रोख प्रवाहावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कारण त्यांना जीएसटी पेमेंट रोख स्वरूपात करावे लागू शकते. या तांत्रिक समस्येमुळे GSTR-1 रिटर्न फाइलिंग, ऐतिहासिक डेटा अॅक्सेस करणे आणि अधिकृत सूचनांना प्रतिसाद देणे यासारख्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
जीएसटी(GST) पोर्टल बंद असल्याने करदात्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मासिक आणि तिमाही रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असूनही, पोर्टल २४ तासांहून अधिक काळ बंद आहे. रिटर्न भरण्याची शेवटची तारीख शनिवार, ११ जानेवारी २०२५ आहे, परंतु पोर्टलच्या समस्यांमुळे अनेक व्यापारी रिटर्न भरू शकत नाहीत. सध्याची परिस्थिती पाहता, व्यापारी सरकारकडे ११ जानेवारीवरून १३ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्याची मागणी करत आहेत.
गुरुवारी या मुद्द्यावर उत्तर देताना, GSTN च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने म्हटले आहे की, “काही वापरकर्त्यांना त्यांचा GSTR-1 सारांश तयार करण्यात आणि दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी असेही सांगितले की त्यांची तांत्रिक टीम ही समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम सुरु आहे.
तसेच वापरकर्त्यांना माहिती देण्यात आली आहे की, ‘ही वेबसाइट शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता होती. मात्र ही वेबसाईट आज (10 जानेवारी) संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. अपडेटमध्ये असेही म्हटले आहे की काही वापरकर्त्यांना GSTR-1 सारांश तयार करण्यात आणि दाखल करण्यात समस्या येत होत्या आणि त्यांची तांत्रिक टीम ही समस्या लवकर सोडवण्यासाठी काम करत आहे.
लोकांच्या मते गेल्या अनेक तासांपासून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत पण फाइल अपडेट होत नाहीये. यावेळी व्यापाऱ्यांना रिटर्न भरताना कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा होती पण पोर्टल बंद असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्याची योजना आखणाऱ्यांसाठी अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पोर्टल बंद पडल्यापासून करदाताते त्याची वेळ मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत.
हेही वाचा :
“टीम इंडियाच्या गोलंदाजीला धक्का! वेगवान बॉलिंग स्टारचा क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय”
Mirae Asset Small Cap Fund गुंतवणुकीसाठी खुला, ‘या’ तारखेला होणार सब्स्क्रिप्शन बंद
मविआत एकत्र येण्यासारखं काही नव्हतं, कॉंग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र होते; मुनगंटीवारांची टीका