गुरु रंधावा रुग्णालयात दाखल; गंभीर जखमी

मुंबई – सुप्रसिद्ध गायक गुरु रंधावाला रुग्णालयात(hospital)दाखल करण्यात आलं असून त्याने सोशल मीडियावर रुग्णालयाच्या बेडवरून फोटो पोस्ट करून ही बातमी दिली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी, गायकाने रुग्णालयातील धक्कादायक फोटो शेअर करून हेल्थ अपडेट शेअर दिली. यासोबतच त्याने रुग्णालयात दाखल होण्यामागील खरं कारणही सांगितलं आहे. ‘शौंकी सरदार’ चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं, असं त्याने सांगितलं.

गुरु रंधावा अलीकडेच त्याच्या ‘शौंकी सरदार’ या पंजाबी चित्रपटाचं शूटिंग करत होते, ज्यामध्ये बब्बू मान, निमृत कौर अहलुवालिया आणि गुग्गु गिल यांच्याही भूमिका आहेत. एका अ‍ॅक्शन सीनमध्ये काम करताना त्याला दुखापत झाली. इन्स्टाग्रामवर, गुरु रंधावाने त्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना त्याच्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे.

गुरु रंधावाने लिहिलं, ‘माझा पहिला स्टंट, माझी पहिली दुखापत, पण माझं धाडस अबाधित आहे. शौंकी सरदार चित्रपटाच्या सेटवरची एक आठवण. हे खूप कठीण आहे… पण मी माझ्या प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.’ फोटोमध्ये, गायक हॉस्पिटलच्या(hospital) बेडवर पडलेला दिसत होता, वेदना होत असतानाही कॅमेऱ्याकडे हसत होता, आणि त्याच्या गळ्यात सर्व्हायकल कॉलर होता.

या पोस्टवर कमेंट करत मृणाल ठाकूरने ‘काय झालं’ अशी कमेंट केली. दुसरीकडे, आॅरीने लिहिलं, ‘अरे नाही. लवकर बरा हो.’ गायक मिका सिंगनेही आपली निराशा व्यक्त केली आणि लिहिलं, ‘लवकर बरा हो’ त्याच्या चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये अभिनेता-गायकाला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘लवकर बरा हो चॅम्प’ असं एका चाहत्याने लिहिलं. दुसऱ्याने लिहिलं, ‘सर्व काही ठीक होईल पाजी.’ तिसऱ्या यूजरने लिहिलं, ‘मी ही पोस्ट पाहू शकत नाही, मला विश्वास बसत नाहीये की तुम्ही या अवस्थेत आहात.’

हेही वाचा :

IND vs PAK सामन्यापूर्वी चाहतेही लागले कामाला, भारताच्या विजयासाठी खास हवन करतानाचा Video व्हायरल

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनी नैराश्येत; महाविद्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी अन्…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट! महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता