काल घडले, ते उद्या घडेल? पवार म्हणतात नक्की घडेल!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि मग विधानसभेची(political advertising) निवडणूक लढवा या संजय राऊत यांच्या मागणीला महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा “चेहरा”च पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण प्रवक्ते आहोत अशा गैरसमजुतीत राहून मीडियाशी बोलत होते.

तेव्हा त्यांना अजितदादा पवार यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर शरद पवार(political advertising) हे माझे नेते आहेत असे विधान त्यांनी केले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांना मी नेता म्हणून मानतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे नेमके नेते कोण आहेत उद्धव ठाकरे? शरद पवार? की राहुल गांधी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत यांना जमिनीवर आणलेले आहे.


शरद पवार हे शनिवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर जोरदार बॅटिंग केली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 18 जाहीर सभा घेतल्या त्यापैकी 14 ठिकाणी पराभव झाला. आता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात अशाच जाहीर सभा घ्याव्यात असे उपहासात्मक आवाहन केलेले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा 155 विधानसभा मतदारसंघात पराभव झालेला असून पराभवाची ही परंपरा पुढे नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली ही विधाने स्वाभाविक आहेत पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदार संघ निहाय आकडेवारी त्यांनी बे दखल केलेली आहे की काय असा संशय यावा. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला 37 विधानसभा मतदारसंघात मताधिक्य होते तर राष्ट्रीय काँग्रेसला 19 विधानसभा मतदारसंघात मताधिक्य होते. तर मग त्यांना 50/ 55 जागा मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी दुप्पट जागा जिंकल्या होत्या. याचा अर्थ लोकसभेचे वातावरण विधानसभा निवडणुकीत नसते असा होतो.

विधानसभेच्या 155 मतदार संघात महायुतीचा पराभव झाला आहे आणि हेच चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे असा आत्मविश्वास शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, ईव्हीएम मशीन हे दोन मुद्दे महाविकास आघाडी कडून अर्थात इंडिया आघाडीकडून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले होते. आता हेच मुद्दे घेऊन महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही. आता त्यांना नवीन मुद्दे शोधावे लागतील.

कल्याणी नगर परिसरात मस्तवाल बिल्डर पुत्राने त्याच्या भरधाव कारखाली दोघा जणांना चिरडल्यानंतर पुणे शहरातील पब संस्कृती पुढे आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून अनाधिकृत पब आणि बार यांच्यावर हातोडा चालवला जात आहे. या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी दहा वर्षे तुम्ही झोपला होता काय? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांचा हा सवाल पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना उद्देशून असावा. त्यांचा हा सवाल अनाठाई नाही पण महाराष्ट्रात महायुतीच्या आधी महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि पुण्यातील पब आणि बार संस्कृती ही काही नव्याने कालपरवा उदयास आलेली नाही. ती कितीतरी वर्षे आहे आणि तेव्हा काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यामुळे त्यांचा हा सवाल पूर्णपणे राजकीय आहे.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच म्हणण्यानुसार अपेक्षेपेक्षाही जास्त यश महाविकास आघाडीला मिळालेले आहे. त्यामुळे हे यश विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्याचे किंवा यशाची कंटिन्युटी ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. सर्वसामान्य मतदारांची लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी मानसिकता होती तीच मानसिकता विधानसभा निवडणुकीत दिसेल हा त्यांचा दावा कार्यकर्त्यांना फुल्ली रिचार्ज करणारा आहे.

हेही वाचा :

शरद पवार गटाच्या नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे अन् अजितदादांबद्दल भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

NEET परीक्षा ऑनलाइन होणार? पेपरफुटीच्या घटनांनंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत