कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स

कपडे धुणे, वाळवणे, इस्त्री करणं हे खूप अवघड काम आहे. अनेकांना हे अजिबात आवडत नाही. कपडे धुतले तरी (easy ironing) इस्त्री करताना नेहमीच त्रास होतो. जर घाईघाईने तयारी करावी लागली तर ते आणखी कठीण होते.
जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कपडे इस्त्री करण्यास खूप आळस दाखवतात. तर आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. (easy ironing) ज्याचा वापर करून तुम्ही कमी वेळात कपड्यांना कडक इस्त्री करू शकता.
१) घाईघाईत इस्त्रीचा वापर करू नका
जर कपडे जास्त चुरगळलेले असतील तर घरीच इस्त्री वापरू शकता. स्प्रे बाटलीतून थोडेसे पाणी कपड्यांवर घालून इस्त्री फिरवल्यास कपडे बर्याच प्रमाणात सरळ होतात. कपड्यांवर स्प्रे करून एकदा दोनदा फिरवल्यास कपडे पटकन कडक होतील. इस्त्री व्यवस्थित तापल्यानंतरच कपड्यांवर फिरवा.
२) स्प्रे केल्यानंतर इस्त्री करा
पाण्याचे काही थेंब चमत्कार करू शकतात आणि म्हणून इस्त्रीपुर्वी फॅब्रिकवर थोडेसे पाणी शिंपडणे महत्वाचे आहे. लोकांना असे वाटते की हे फक्त कॉटनच्या कपड्यांसाठी आहे, परंतु तसे नाही. हे सामान्य कपड्यांसाठी देखील तितकेच उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. जर तुम्ही वाफेची इस्त्री वापरत असाल तर त्याचाही तसाच फायदा मिळेल.
३) कपड्यांना लटवकून ठेवा
एकदा कपडे इस्त्री केल्यानंतर त्यांना हँगरला लावा. कापड गरम असताना काही लहान रेशा राहिल्या तरी गुरुत्वाकर्षणामुळे त्या दूर होऊ शकतात. कपडे हँगरमध्ये व्यवस्थित लटकवा, यामुळे नवीन चुरगळ्या पडण्याचा होण्याचा धोकाही कमी होतो.
४) व्हिनेगरचा वापर
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हिनेगर वापरून तुम्ही कपडे व्यवस्थित ठेवता येऊ शकतात. ही एक चांगली युक्ती सिद्ध होऊ शकते. पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर घालून ते विरघळवा. 1 ग्लास पाण्यात 1 चमचे पांढरे व्हिनेगर घाला. आता हे पाणी फवारून तुमचे काम करा. असे केल्याने कपडे लवकर सरळ होतील. पण व्हिनेगर थोडेच घालावे लागेल. जास्त मिक्स करू नका, हे फक्त चुरगळलेला भाग लवकर काढून टाकण्यासाठी आहे. जास्त प्रमाणात वापरू नका नाहीतर फॅब्रिक खराब होऊ शकते.
५) स्ट्रेटनरचा वापर
ज्याप्रमाणे तुम्ही इस्त्रीने कपडे पटकन प्रेस करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रेटनर देखील वापरू शकता. चुरगळलेले कपडे व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही स्ट्रेटनरचा वापर करू शकता. कपडे दोन्ही बाजूंनी एकत्र प्रेस करा.
हेही वाचा :