अॅपलनं आणली पाण्याची बाटली…

Smart News:- महागड्या आयफोनसाठी (i-Phone) प्रसिद्ध असलेल्या Apple ने आता पाण्याची बाटली लॉन्च केली आहे, ज्याची किंमत भारतात सुमारे 4,600 असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडेच, कंपनीने सुमारे 1,900 किंमतीचे पॉलिशिंग कापड लाँच केले होते त्यानंतर आता कंपनीने अमेरिकन कंपनीच्या मदतीने Hidrate Spark नावाची पाण्याची बाटली लॉन्च केली आहे.
पाण्याच्या बाटलीत खास काय
HidrateSpark पाण्याची बाटली Apple च्या वेबसाइटवर आणि किरकोळ स्टोअरवर 59.95 डॉलर म्हणजेच अंदाजे 4,600 रुपयांमध्ये उपलब्ध असून, ही बाटली सध्या फक्त यूएस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
बाटली इतकी महाग का?
ही एक स्मार्ट पाण्याची बाटली असून, तुमच्या दैनंदिन पाणी किंवा द्रवपदार्थांच्या सेवनावर याद्वारे लक्ष ठेवता येऊ शकते. एवढेच नव्हे तर, ही बाटली तुम्ही तुमच्या Apple Health शी सिंक करू शकता.
Smart News:-
Xiaomiचा स्टायलिश स्मार्टफोन लाँच; 18 मिनिटांत होतो पूर्ण चार्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठामुळे खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळेल – मंत्री सुनील केदार
बीअर महागणार, कंपन्यांकडून दरवाढ करण्याची मागणी
अमिताभचा ‘खइके पान बनारस’ बाबत मोठा खुलासा;म्हणाले,’मी त्याची नक्कल केलेली’
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील”: शत्रुघ्न सिन्हा