अभियांत्रिकी शिक्षण झालंय? मग ‘ही’ भरती खास तुमच्यासाठी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने भरतीचे आयोजन केले आहे. एकूण ३५० रिक्त जागांसाठी हे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोबेशनरी इंजिनिअरच्या(engineering) पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इलेट्रॉनिक्स तसेच मॅकेनिकल विभागामध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात विविध ठिकाणी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना(engineering) १० जानेवारी २०२५ पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. संध्याकाळी ४ वाजल्यापासून अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. मुळात, उमेदवारांना या दिवशी रात्री ११:५० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ११८० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही रक्कम सारखी आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PwBD आणि माजी सैनिकांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहेत. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत, तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहेत. या भरतीसाठी कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

शासनाच्या नियमांनुसार, OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात ३ वर्षे अधिक सूट देण्यात येणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे अधिक सूर देण्यात येणार आहे. PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० वर्षांपर्यंत सूट देण्यात येईल.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना नियुक्तीच्या प्रक्रियेत संगणकावर आधारित परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे तसेच पात्र करावे लागणार आहे. तसेच उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे.

प्रोबेशनरी इंजिनिअरच्या पदासाठी एकूण २०० जागा रिक्त आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज कर्ता उमेदवार BE/B.Tech/B.Sc पदवीधर असणे आवश्यक आहे. मेकॅनिकल विभागात १५० रिक्त जागांसाठी अर्जाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तर या पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार BE/B.Tech/B.Sc (Engineering) in Mechanical पदवीधर असणे आवश्यक आहे. विविध प्रवर्गांसाठी विविध जागा आरक्षित आहेत.

हेही वाचा :

करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!

…तर नवी कार खरेदी करणं अशक्यच; सरकारच्या नव्या धोरणामुळे होऊ शकतो अनेकांचा स्वप्नभंग

युजवेंद्र चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा घटस्फोट!