हनुमानांच्या डाव्या पायाचा आकार असलेले तळे इथले आकर्षण (attraction)आहे.
बाल हनुमान नटखट होते. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बाल हनुमान घरात खेळत (attraction)असताना त्यांना झाडावरील एक आंबा खायचा होता. पिवळा धमक दिसणारा तो आंबा कधी एकदा खातोय, असे त्यांना झाले. त्या फळासाठी त्यांनी आकाशात उंच झेप घेण्याचे ठरवले.
पण ते चमकते फळ झाडाला नाही तर आकाशाला लागलेले होते. बाल हनुमान जो हट्ट करत होते ते सुर्याला खाण्याचा होता. यासाठी त्यांनी उंच आकाशात झेपही घेतली. ती झेप ज्या डोंगरावरून घेतली तो आपल्या महाराष्ट्रात आहे.
हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरूनच पडले असल्याचे जाणकार सांगतात. त्र्यंबकेश्वरमधील पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे.
मारूतीरायांच्या या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच गुहेत जैनधर्मीय लेणी आपल्याला दिसून येतात. पुढे पठारावर पोहोचल्यावर काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दृष्टीस पडते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी देखील तिथे योग्य अशी सोय केली आहे.
बाल हनुमान लहानपणीही नटखट होते. त्यांच्या पराक्रमांना बालपणही रोखू शकले नाही. अगदी अजाणत्या वयातही त्यांनी सुर्याकडे झेप घेण्यासाठी आकाशात उंच उडी घेतली होती. तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा या अंजनेरी पर्वतावर आहे. तिथे एक तळे निर्माण झाले असून त्याचा आकार मानवी पायासारखाच आहे.
जेव्हा तुम्ही बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर तेव्हा तुम्हाला समजेल की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहे. या तळ्यात नेहमी पाणी असते. या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळाले असे सांगितले जाते.
हेही वाचा :
निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ
विशाल पाटलांचं ठरलं, आता माघार नाहीच..! ‘या’ चिन्हावर लढणार तर शेट्टींना पुन्हा…
सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका…