मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे…’, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

भारतात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी अनेक (decision)कठोर कायदे करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. पण अनेकदा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केसे जातात. अशावेळी अल्पवयीन मुलीची शारीरिक संबंध ठेवताना संमती असली तरी आता तो एकाप्रकारचा गुन्हा असणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याची स्पष्टोक्ती असल्याचम म्हटलं आहे.अल्पवयीन मुलीने शरीरासंबंधासाठी दिलेल्या सहमतीला काहीच अर्थ नाही, असं हायकोर्टाने निकालाता म्हटलं आहे. तसेच कोर्टाने अल्पवयीन (decision)मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला अत्याचाराच्या गुन्हा अंतर्गत सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये एका तरुणाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने पीडितेच्या संमतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरोपींने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याठिकाणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. अल्पवयीन (decision)मुलीच्या सहमतीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले तरी तो गुन्हाच ठरतो, अशा प्रकारचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.

ही संबंधित घटना भंडारा जिल्ह्यातील आहे. २०१६ मध्ये येथील एका अल्पवयीन मुलीची तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांमधील ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान आरोपीने लग्न करण्याचे वचन देऊन अल्पवयीन असलेल्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवसे. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास नका दिला. त्यामुळे मुलीने 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सप्टेंबर 2022 रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते मात्र ते अपील हायकोर्टाने फेटाळले. शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

वर्षभरातील घटना
गेल्या वर्षभरात २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५५२ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याचबरोबर हुंडाबळी, अपहरण, मारहाण, अनैतिक व्यापार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या सांख्यिकी अहवालातून ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या या गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट