तीन वेळा डोकं भिंतीवर आपटलं, नंतर गळा दाबला खून करुन मृतदेह बाथरुममध्ये लपवला अन्…

पतीनेच पत्नीची निर्घुण(Murder) हत्या केल्याची घटना खोपोलीमध्ये घडली आहे. या सगळ्या हत्येचा थरार पाहता परिसरात खळबळ माजली आहे. 8 जानेवारीला रात्री उदय विहार भागात सुखकर्ता आपर्टामेंट मध्ये गणेश घोडके वय 32 व त्याची पत्नी शीतल घोडके वय 28 वर्षे हे मागील तीन चार महिन्यान पासून रहात होते.

लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यांना मुलबाळ नव्हते. दोघे पती पत्नी एकमेकांवर (Murder)चारित्र्यावरून संशय घेत होते. त्यांची कायम भांडण होत असायची अशी माहिती खोपोली पोलीसांनी दिली आहे. 8 जानेवारीच्या रात्री या पती पत्नीमध्ये काडाक्याची भांडणं झाली.

लग्नाला पाच वर्ष होऊनही मुलबाळ होत नव्हतं म्हणून या जोडप्याध्ये सतत खटके उडच असायचे. मात्र बुधवारी रात्री यांच्यातले वाद विकोपाला गेले, आणि या वादातूनच शीतलचा पती गणेश घोडके याने पत्नीला रागाच्या भरात भितींवर आपटलं.

भांडणात रागाच्या भरात गणेशने पत्नी शीतल हिचे डोके दोन तीन वेळा भिंतीवर आपटले. त्यानंतर तिचा गळा आवळला. गणेश आणि शितल यांना मुल न होणं हे भांडणाचं कारण होतं. त्याचबरोबर दोघंही पती पत्नी कायमच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. याच भांडणातून गणेशचा रागावरचा ताबा सुटला आणि त्याने रागाच्या भरात पत्नीचा जीव घेतला.

पत्नीची हलचाल होत नाही हे पाहून बिथरलेल्या गणेशने त्याच्या मित्राला फोन केला. त्याने मित्राला घरी बोलावून घेतलं. गणेशने घडलेला प्रकार सांगितला. तसं त्याचा मित्र आशुतोषने गणेशला पोलिसांत जाण्याबाबत सांगितले. मात्र घाबरलेल्या गणेशने मित्राचं न ऐ्कता पसार झाला. तेव्हा गणेशचा मित्र आशुतोष खोपोली पोलीस ठाण्यात जात घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला.

या दरम्यानच्या काळात गणेशने आपल्या पत्नीचा मृतादेह बाथरूम मध्ये टाकला. त्यानंतर गणेश आपली कार घेऊन पसार झाला. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना शीतलचा मृतादेह बाथरूम मध्ये सापडला. पण गणेश सापडला नाही. तसं पोलिसांनी तपासाची चक्रे तात्काळ हलवली व गणेशचा शोध सुरु केला.

गणेश आपली कार घेऊन साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचे समजताच सातारा टोल नाक्यावर त्याला जेरबंद करून ताब्यात घेतले व अवघ्या 12 तासाच्या आता त्याला खोपोलीला आणले.गणेश घोडके यांनी गुन्हा कबूल करीत सारी हकीकत पोलिसांना सांगितली. पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहेत.

मोठ्या शिताफिने खोपोली पोलिसांनी अवघ्या बारा तासात पळून जाणाऱ्या पतीला साताऱ्यात जेरबंद केले. दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी गणेश घोडके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती खोपोली पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

शाहिद कपूरच्या ‘देवा’ ट्रेलरला मिळाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा सिग्नल!

सूर्या-सॅमसन बाहेर, जडेजा-शमीचे पुनरागमन, आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ

तरुणाने कपडे काढून महिलेला व्हिडिओ कॉल केला अन् नंतर ब्लॅकमेल होताच जीवही दिला