वोट करायला मतदान केंद्रावर पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या

सांगोला तालुक्यात मतदाराकडून मतदान मशीन(evm machine) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका मतदार केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.

मतदान मशीन (evm machine)पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तरूणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हा प्रकार करणाऱ्या संबंधित तरूणाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात येत होत्या. इतकंच नाहीतर मतदार केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान मशीन बोगस असल्याचा आरोपही त्या तरूणाने केला. यावेळी तरूणाने मतदानाच्या मशीनवर पेट्रोल टाकून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र अधिकाऱ्यांनी वेळेच धाव घेत हा धक्कादायक प्रकार रोखला आणि त्या तरूणाला पोलिसांच्या हवाले केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडत आहे. राज्यातील ११ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू असताना कुठे उत्साह तर कुठे शुकशुकाट दिसतोय.

हेही वाचा :

लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा

बोगस मतदान झाल्याच्या आरोपावरून कोल्हापूरातील मतदान केंद्रावर गोंधळ!