आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर; कर्मचाऱ्यांचा सुट्ट्या रद्द अन् रूग्णालयात…

कोविड -19 नंतर चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घालायला सुरूवात केली. काल भारतातही या विषाणूचे चार-पाच रूग्ण (Health)आढळून आले. महाराष्ट्राती नागपूर जिल्ह्यात आज सकाळी दोन एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेल्या दोन रूग्णांची नोंद करण्यात आली.

पण त्यानंतर राज्यातील आरोग्य (Health)यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. तर देशभरात देखील बंगळुरू आणि गुजरातमध्ये एचएमपीव्ही व्हायरासचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभगाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच hpmv व्हायरस औषधांचा अतिरिक्त साठा तयार ठेवला जात आहे. हिंगोली आरोग्य विभागाने देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात 25 आयसीयू आणि 50 जनरल बेड राखीव ठेवले गेले आहेत.

राज्यात या व्हायरस बाबत खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभाग सावध झाला आहे. औषधांचा साठा वाढवला जात आहे. आयसीयू आई जनरल बेडसची संख्या वाढवली जात आहे. नागरिकांमध्ये मार्गदर्श तत्वे जारी केली जात आहेत. रूग्णालयांमध्ये पूढी दोन ते तीन महीने पुरेल इतका औषधांचा साठा केला जात आहे.

साथीच्या आजारांचे तज्ञ डॉ. रवी गोडसे यांनीदेखील या व्हायरला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. एचएमपीव्ही रोगाचा भारताला फारसा धोका नसल्याचे डॉ. गोडसे यांनी म्हटले आहे. भारतातील नागरिकांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही. चीनमध्ये सध्या नागरिक मास्क घालूनच फिरत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मात्र चीनमध्ये प्रदूषणाची समस्या मोठी असल्याने तेथील नागरिक कायमच मास्क घालून फिरत असतात. हा व्हायरस हा अत्यंत साधा आहे. कमी किंवा जास्त वय असलेल्या लोकांना हा व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
HMPV विषाणूने भारतातही थैमान घातले आहे. भारतात आठ महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, कर्नाटकमध्ये HMPV ची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतासह अनेक देशांमध्ये HMPV संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही सतर्क आहे. आरोग्य विभागाने एचएमपीव्ही संदर्भात लोकांना एक सूचना जारी केली आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यात आले आहे.

HMPV टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये…

  1. शिंकताना किंवा खोकताना रुमाल आणि कापडाचा वापर करा.
  2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरणे सुरू करा.
  3. खोकला आणि सर्दी झालेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
  4. इतरांशी हस्तांदोलन थांबवावे लागेल.

5.एकच टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा पुन्हा वापरू नका.

6.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करावे.

  1. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास, स्वतःहून औषध सुरू करू नका.
  2. वारंवार डोळे, नाक आणि कानाला स्पर्श करणे टाळा.
  3. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

हेही वाचा :

गृहिणींना मोठा दिलासा! आठवडाभरात लसूण, कांद्याचे दर उतरले; सध्या किंमत किती?

सलमान खानच्या जीवाल पुन्हा धोका? सुरक्षेत वाढ अन् गॅलेक्सीच्या बाल्कनीत बसवली बुलेटप्रूफ काच

Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स