Cholesterol ची पातळी कमी करतील हे 3 ड्रिंक्स!

cholesterol

हाय कोलेस्ट्रॉलचं (cholesterol) नियंत्रणात राखण्यासाठी आहारात अनेक बदल करावे लागतात. उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपण काय खात आहोत याची काळजी घेतली पाहिजे. कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षात घेऊन नेहमी चांगले आणि शरीराला फायदेशीर पदार्थ खाल्ले पाहिजेत.

उच्च कोलेस्टेरॉलमुळे (cholesterol) अनेक जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हे लक्षात येताच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवे. आज जाणून घेऊया असे काही ड्रिंक्स ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. एक कप ग्रीन टीमध्ये 50 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅटेचीन असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर ग्रीन टीचं सेवन फायदेशीर ठरेल.

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन शरीरातील लिपिड्सची पातळी वाढवतं आणि कोलेस्ट्रॉलमध्ये असलेल्या लिपोप्रोटीनची पातळी कमी करतं. एका संशोधनानुसार, ‘टोमॅटो उत्पादनांच्या उच्च वापरामुळे एथेरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव असतो, ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.’

ओट मिल्क

एका संशोधनानुसार, ओट मिल्क कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. ओट्स कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात मात्र त्यापेक्षाही ओट्सचे मिल्क अधिक प्रभावी असल्याचं आढळलं आहे.

Smart News:-

समंथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने धरला ठेका…


ऐश्वर्या रॉय मालामाल, केली कोट्यवधींची कमाई


राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेला 15 हजार लोकांची परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *