महाराष्ट्रात शुक्रवारी 611 कोरोना रूग्णांची नोंद, दोन बाधितांचा मुत्यू

corona patients

राज्यात आज 611 नव्या कोरोना रूग्णांची(corona patients) नोंद झाली आहे. तर दोन बाधितांचा आज मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

 काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. राज्यात आज 611 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन बाधितांचा आज मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा(corona patients) बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 687 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात 687 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,66,82 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.13 टक्के एवढे झाले आहे.

दोन बाधितांचा मृत्यू  
राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

सक्रिय रूग्ण
राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असले तरी सक्रिय रूग्णांच्या संख्येत मात्र रोज घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 3,779 सक्रिय रुग्ण आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात  आहेत. पुण्यात सध्या 1163 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईत 752 सक्रिय रूग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ ठाण्यात 493 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात सर्वाधित सक्रिय रूग्णसंख्या मुंबईत होती. परंतु, मुंबईतील सक्रिय रूग्ण संख्येत चांगलीच घट झाली आहे. त्या तुलनेत पुण्यातील सक्रिय रूग्णांमध्ये तेवढी घट झाली नाही. त्यामुळे आता राज्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत.

रूग्ण संख्येत चढ-उतार 
गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याआधी म्हणजे बुधवारी राज्यात 640 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी देखील बुधवारपेक्षा कमी रूग्णसंख्या होती. मंगळवारी
550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, सोमवारी खूपच कमी रूग्णसंख्या आढळल्याने दिलासा मिळाला होता. सोमवारी राज्यात फक्त 292 कोरोनाचे रूग्ण आढळले होते. परंतु, त्यानंतर यात वाढ होत गेली आणि आज ही संख्या 611 वर पोहोचली.

देशातील स्थिती 
राज्यातील रूग्ण(corona patients) संख्येत चढ-उतार होत असले तरी देशातील कोरोनाचा आलेख मात्र घटला आहे. देशात गेल्या 24 तासांत 5383 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कारण अवघ्या काही दिवसांवर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आहे. कोरोनाचा आलेख घटताना दिसतोय. त्यामुळे यंदा सण आणि उत्सव जोरदार उत्साहात साजरे होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 217 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

Smart News:-