रात्री झोप पूर्ण होत नाही तर वापरा या टिप्स…

झोप (sleep ) आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येकाने रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना कुठेही आणि केव्हाही झोप येते, परंतु असेही बरेच लोक आहेत ज्यांना रात्री झोपण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
चांगली झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Home Remedies For Good Sleep)
1. जीवनशैलीत करा बदल (Lifestyle Changes) :
जीवनशैली (Lifestyle) सुधारणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या झोपेसाठी वेळेवर झोपायला जाणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वेळेवर झोपण्याचा प्रयत्न केला नाही तर निद्रानाशाची समस्या वाढू शकते.
2. कोमट दूध प्या (Drink Warm Milk) :
दुधामध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे झोप वाढवण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात अर्धा चमचा दालचिनी पावडर (Cinnamon powder) टाकून प्या.
3. तेल मालिश उपयोगी (Oil Massage) :
डोके व पायांना भृंगराज तेलाने मसाज केल्याने झोप चांगली लागते. या तेलाने मसाज केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो.
4. केशर (Saffron) :
जर तुम्हाला झोपेचा उपचार करायचा असेल तर केशर देखील यामध्ये मदत करू शकते. एक कप कोमट दुधात दोन चिमूट केशर मिसळून प्या. केशरमध्ये इम्युनिटीला फायदा देणारे घटक असतात.
5. जिरे (Cumin) :
आयुर्वेदात औषधी गुणधर्माने समृद्ध असलेले जिरे झोपेसाठी फायदेशीर मानले जाते. यात मेलाटोनिन असते, जे निद्रानाश आणि झोपेच्या इतर विकारांना दूर करते. मेलाटोनिन हा होर्मोन आहे जो झोपेसाठी मदत करतो. झोपण्यापूर्वी जिर्याचा चहा चांगली झोप देण्यास मदत करतो. दुधात एक चमचा जिरे पावडर (Cumin Powder) टाकून प्यायल्याने रात्री चांगली झोप लागते.
हेही वाचा :