Belly Fat घटवण्यासाठी कामी येतील ‘या’ आयुर्वेदिक टीप्स!

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं ही एक समस्या आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान ही समस्या अजूनच वाढली आहे. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं प्रत्येकाला कठीण जातं. खासकरून बेली फॅट म्हणजेच पोटाजवळ असलेल्या चरबीपासून मुक्त होणं खूप कठीण होतं. पोटावर साठलेली ही चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.(ayurvedic tips)
वर्कआउट्स आणि डाएटच्या मदतीनेही अनेक लोक पोटाची चरबी कमी करू शकत नाहीत. यामागे अनुवांशिक कारणही असू शकते, पण आयुर्वेदानुसार जीवनशैलीत काही बदल केल्यास पोटाची चरबी कमी होऊ शकते.(ayurvedic tips)
जेवण योग्य पद्धतीचे चावा
अनेकदा लोक घाईत जेवतात आणि यावेळी अन्न नीट चावत नाहीत. अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी ते नीट चावून खाणं आवश्यक आहे. जेव्हा कर्बोदके तोंडाच्या लाळेमध्ये मिसळतात तेव्हा पचन सुरू होतं. त्यामुळे अन्न नीट चावलं पाहिजे.
मेथीचं पाणी
पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी भाजलेल्या मेथीची पावडर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्या. याशिवाय तुम्ही मेथी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करू शकता. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते.
वेगाने चाला
दररोज चालणं देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करू शकते. दररोज किमान 30 मिनिटं वेगाने चाला. याशिवाय तुम्ही योगा, एरोबिक्स आणि प्लेट्सच्या मदतीने पोटाची चरबी कमी करू शकता.
रात्रीचं जेवण कमी घ्या
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण चांगलं करा जेणेकरून तुम्हाला दिवसभरात पुरेशी ऊर्जा मिळेल. पण रात्रीचे जेवण हलकं ठेवा आणि संध्याकाळी 7 किंवा 8 वाजल्यानंतर काहीही खाऊ नका. त्यामुळे पोटाची चरबी वाढत नाही. तसंच, मिठाई, साखरयुक्त पेये आणि तेलकट पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
हेही वाचा :