रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर होतील ‘हे’ गंभीर परिणाम..!

धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळानूसार आपल्या सवयी देखील बदलत आहेत. परिणामी आरोग्याच्याअनेक समस्या जाणवायला लागल्या आहेत.रात्री झोपत असताना खोलीत रंगीत लाईट (light) लावत असाल तर सावध व्हा.
बाजारात सजावट आणि खोली आकर्षक होण्यासाठी अनेक पद्धतीच्या लाईट्स (light) उपलब्ध आहेत. कृत्रीम लाईट्सच्या आजूबाजूस झोपणे ही गोष्ट आरोग्यासाठी अधिक घातक ठरत आहे. कृत्रीम लाईट्समुळे ग्लुकोज लेव्हल वाढत असल्याचं समोर आलं आहे.
कृत्रीम लाईट्समुळे मेटाबाॅलिज्म खराब होत जाते परिणामी ह्रद्यरोग, डायबिटीज, मेटाबाॅलिज्म सिंड्रोम यांसारख्या समस्या जाणवायला लागतात. नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठ शिकागोमध्ये याविषयी संशोधन करण्यात आलं आहे. अनेक स्तरामध्ये संशोधन केल्यानंतर संशोधक निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, कृत्रिम लाईट्सचा उपयोग सध्या शहरी भागात अधिक प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. नर्व्हस सिस्टीममध्ये बदल होत असल्याचंही समोर आलं आहे.
हेही वाचा :