तुमच्या दररोजच्या एका सवयीमुळे वाढतंय Belly fat

तुमचंही वजन वाढलंय? (belly fat tips) तुम्ही प्रयत्न करताय पण काही केल्या वजन कमी होत नाहीये? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वजन कमी करण्याच्या तुम्ही काही चुका करताय आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाहीये. अनावश्यक वजन वाढणं केवळ शरीरासाठी हानिकारक नसतं, तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील अयोग्य ठरतं. मात्र आपल्या दैनंदिन जीवनातील एक सवय वजन वाढण्यास कारणीभूत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 1975 पासून जगभरात लठ्ठपणाचं (belly fat tips) प्रमाण जवळपास तीन पटीने वाढलं आहे. 2016 मध्ये, 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 1.9 अब्जापेक्षा अधिक प्रौढांचं वजन जास्त होते, त्यापैकी 650 दशलक्षांपेक्षा जास्त लठ्ठ होते. दरम्यान लठ्ठपणा हे भारतातील हृदयाशी संबंधित आजारांचं कारण बनत चाललं आहे.
नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, केवळ चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणाची कारणं नसून झोपेची कमतरता हे देखील त्यामागे एक मोठे कारण आहे. वेळेवर झोप न लागल्यामुळे किंवा चांगली झोप न घेतल्यानेही पोटाची चरबी वाढते.
JAMA नेटवर्क ओपनद्वारे एक ऑनलाइन संशोधन करण्यात आलं. या संशोधनामध्ये 26 देशांतील 137,000 लोकांचा सहभाग होता. ज्या सहभागींनी त्यांच्या झोपण्याच्या सवयींबद्दल प्रश्नांची उत्तरं दिली, त्यापैकी सुमारे 14 टक्के लोकांनी सांगितलं की, ते मध्यरात्री किंवा त्यानंतर. रात्री 8 ते 10 या वेळेत झोपण्याच्या वेळेच्या तुलनेत, यानंतर झोपल्याने लठ्ठपणा किंवा बेली फॅट वाढण्याचा धोका वाढतो.
पुरेशी झोप न घेतल्याने वजनात वाढ होते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, रात्री 7 ते 8 तास झोप न घेतल्यामुळे शरीरात कोर्टीसोल नावाचा हार्मोन तयार होऊ लागतो. यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शक्य तितका वेळ शरीराला झोप द्या.
हेही वाचा :