Corona Outbreak : चीनमधून मायदेशी परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील

चीनमधून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार आढळून आला आहे. 40 वर्षीय व्यक्ती उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील शाहगंज भागातील रहिवासी आहे. 23 डिसेंबर रोजी तो चीनमधून आग्रा येथे परतला असून यानंतर त्याची कोविड-19 चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली. रविवारी (25 डिसेंबर) हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यानंतर आरोग्य विभागाने तातडीने रॅपिड रिस्पॉन्स टीम त्याच्या घरी पाठवली.(positive)
आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, वर्षाच्या शेवटी अनेक लोक व्यवसायासाठी प्रवास करतात, जे बाहेर प्रवास करून परत येत आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.(positive)
व्यक्तीचे घर सील
दरम्यान या कोरोनाबाधित व्यक्तीचे घर सील करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे अत्यावश्यक असून बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.(positive)
सरकार हाय अलर्टवर
चीनने या महिन्यात निर्बंध उठवल्यानंतर कोविड संसर्गामध्ये वाढ झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भारत सरकार हाय अलर्टवर आहे. भारताने कोविड-19 महामारीच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे सुरू केले आहे .
केंद्र आणि राज्य सरकारने सणांच्या काळात समारंभांवर कोणतेही निर्बंध लादलेले नसले तरी, सरकारकडून लोकांना कोरोना बाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यास, सोशल डिस्टंसींग राखण्यास सांगितले आहे.