तुमच्या डोळ्याच्या खालीही डार्क सर्कल आहेत?, करा ‘हे’ घरगुती उपाय

dark circles under eyes

डार्क सर्कल (dark circles under eyes) प्रत्येक दुसऱ्या मुलीशी संबंधित समस्या आहे. डार्क सर्कलमुळे चेहरा डल दिसतो. डार्क सर्कलमुळे मुलींना अनेकदा न्यूनगंड येतो. पण हे डार्क सर्कल कशामुळे येतात, याची कारणं काय आहेत? डार्क सर्कल येण्यामागील कारणं म्हणजे तणाव (Stress). तुमच्या आयुष्यात खूप ताण-तणाव असेल तर डार्क सर्कल येतात.

झोप कमी झाल्याने, धावपळीमुळेही डार्क सर्कल (dark circles under eyes) येण्याचं प्रमाण वाढतं. डार्क सर्कल लपवण्याचा खूप प्रयत्न करूनही ते लपत नाहीत. त्यामुळे डार्क सर्कल घालवण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करणं गरजेचं आहे.

कोल्ड कॉम्प्रेस लावा

कोल्ड कॉम्प्रेस लावल्याने सूज कमी होण्यास आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत होते. हे सूज कमी करते आणि डार्क सर्कल दूर करण्यास मदत करते. तुम्ही काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून डोळ्यांना लावू शकता.

शांत झोप घ्या

चांगली झोप घेतल्याने डार्क सर्कल कमी होण्यासही मदत होते. थकवा टाळण्यासाठी किमान 8 तासांची झोप घ्या. यामुळे डार्क सर्कल कमी होतात.

टी-बॅग्ज्

डोळ्यांवर थंड टी-बॅग लावल्याने डार्क सर्कल कमी होतात. चहामध्ये कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रक्ताभिसरण सुधारते आणि डार्क सर्कल जाण्यास मदत होते.


हेही वाचा :


कोल्हापूरमध्ये भाजपाच्यावतीने महाविकास आघाडीचा तीव्र निषेध…


डोक्यावर बंदूक ठेवून सेल्फी घेत होता आणि दाबला गेला ट्रिगर…


“ठाकरे अन् पवारांना फडणवीसच गुंडाळणार”


आता गंगुबाई येणार ओटीटीवर, जाणून घ्या रिलिज डेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *