पालक- पनीर एकत्र खाऊ नये?

वातावरणात होणाऱ्या प्रत्येक बदलाचे थेट परिणाम हे आपल्या राहणीमानावर (passive immunity)होत असतात. बरं इचकंच नव्हे, तर यामध्ये जीभेचे चोचलेही पुरवावे लागतात. सध्याच्या दिवसांबाब सांगावं तर, दिवसागणिक तापमान कमी होत असतानाच अनेकांनी त्यांच्या आहाराच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांविषयी बोलण्याचं कारण म्हणजे, थंडीच्या या दिवसांमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांत एका पालेभाजीला प्राधान्य देण्यात येतं. ती पालेभाजी म्हणजे पालक.

प्रथिनं, तंतुमय घटक , रोगप्रतिकारक(passive immunity) शक्ती  वाढवणारे घटक आणि काही इतरही पोषक तत्त्वं या भाजीमध्ये असतात. पालकचा वापर करून असंख्य पदार्थही तयार केले जातात. परदेशात जिथं पालक कच्चा, उकडून किंवा परतून खाण्याला प्राधान्य देण्यात येतं तिथेच भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.

भात, पराठा , चपाती , नान, रोटी या पदार्थांसोबत पालक पनीर खाण्याला अनेकजण पसंती देतात. पण, तुम्हाला माहितीये का सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आपण ज्या पद्धतीनं खातो ती पद्धतच चुकीची आहे. कारण मुळातच पालक आणि पनीर हे दोन्ही पदार्थ एकत्र न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी हल्लीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली.

यामागचं नेमकं कारण काय?
आरोग्यास पूरक आहार घेण्याच्या सवयींमध्ये तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ला जाण्यासोबतच योग्य पदार्थांची पूरच पदार्थांशीच सांगड घातली जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण चुकीचं Combination पदार्थांमध्ये असणारी पोषक तत्त्वं कमी करतं.

पालक पनीरच्या बाबतीतही तेच
एकिकडे जिथं पनीर कॅल्शियमनं समृद्ध आहे तिथे दुसरीकडे पालक लोहानं परिपूर्ण आहे. अशावेळी जेव्हा हे पदार्थ एकत्र खाल्ले जातात तेव्हा पनीरमध्ये असणारं कॅल्शियम पालकमध्ये असणाऱ्या लोहाचे  परिणाम कमी करतो. त्यामुळं कोणत्याही घटकाचा फायदाच होत नाही. अशा परिस्थितीत पालक हा कायम बटाटा किंवा मक्यासोबत खावा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

इतर कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नयेत?
आयुर्वेदानुसार समप्रमाणात मध आणि तूप  मिसळल्यासही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. खरबूज आणि दुधाचेही वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या गोष्टी एकत्र खाल्ल्यास त्याचा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. चिकन आणि बटाटा हे पदार्थसुद्धा एकत्र खाल्ल्यास त्यामुळं पोट फुगल्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळं चवीनं काहीही खाताना आपण चुकीच्या पद्धतीनं खात तर नाही आहोत याविषयी कायम सजग राहिलेलंच बरं.

हेही वाचा :