तुम्हालाही दिवसभर थकवा जाणवतोय?

तुम्हाला सारखं (fatigue) थकलेलं आणि कंटाळा आल्यासारखं वाचतंय का? मात्र यामागे अनेक कारणं असतात. तुमच्या शरीरातील कमजोरी किंवा झोप न लागल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.

या कारणांनी तुम्हाला जाणवतो थकवा
जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आपले शरीर नेहमी (fatigue) थकल्यासारखे वाटतं. उन्हाळ्यात, तुम्हाला यांसारख्या अधिक समस्या येऊ शकतात.

म्हणूनच उन्हाळ्यात तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवावं. त्यामुळे अशा दिवसांत दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या.
जर तुम्ही सकस आहार घेत नसाल त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवतो. अशा परिस्थितीत जंक फूड आणि प्रोसेस केलेले अन्न खाण्याबाबत टाळा.

तुमच्या शरीरात काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असली तरी तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता असते, तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. झोपेच्या वेळी, तुमचे शरीर आवश्यक असलेले हार्मोन्स रिलीज करते. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्साही वाटते.

हेही वाचा :


धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई घेणार हैदराबादचा बदला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *