stress | या खास टिप्स फाॅलो करा आणि आयुष्यातील तणाव दूर करा!

ऑफिसमधील कामाच्या (stress) ताणामुळे तणाव निर्माण होतो. आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे ताण-तणाव सामान्य बाब झाली आहे. ऑफिसमध्ये कामाच्या जास्त दबावामुळे व्यक्ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील पूर्णपणे थकतो. ऑफिसमधील तणावामुळे स्वभावात बदल होऊन चिडचिडा स्वभाव माणसाचा बनत जातो. मग घर असो किंवा आॅफिस चिडचिड काही कमी होत नाही. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.

तणावामुळे (stress) झोप न लागणे, भूक न लागणे, तहान न लागणे यासारख्या इतर समस्याही सुरू होतात. तुम्हालाही ऑफिसमध्ये तणाव वाटत असेल, तर काही टिप्स फाॅलो करून तुम्ही तणाव कमी करून नक्कीच स्वत:ला निरोगी ठेऊ शकता. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

बऱ्याच वेळा कामाच्या ताणामुळे आपला राग वाढतो. अशावेळी आपण थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे चालायला हवे. यामुळे ताण कमी होतो आणि परत एकदा तुमचा मूड फ्रेश होतो. जेंव्हा ताण जास्त असतो, अशावेळी काॅलवर बोलणे टाळाच.

ऑफिसमध्ये तुमची एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री झाली असेल आणि तुम्ही नेहमी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असाल. परंतु यामुळे तुमच्या कामाचा ताण वाढेल, त्याचबरोबर तुमच्या टार्गेटवरही वाईट परिणाम होईल. तुम्ही तुमच्या कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. यामुळेच आॅफिसमध्ये मैत्री जरी झाली तरीही आपल्या कामावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत काम केल्यामुळे शरीरावरच नव्हे तर मनावरही अतिरिक्त भार पडू लागतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना मधेच ब्रेक घ्यावा. जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर बाहेर पडा आणि फिरायला जा थोड्या वेळ. तसेच तणाव कमी करण्यासाठी तुम्ही एक कप चहा देखील घेऊ शकता.

हेही वाचा :


हलका फुलका मॉर्निंग ब्रेकफास्ट करायचायं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *