पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा आणि चमकदार केस मिळवा…

hair tips

hair tips – आपले केस (Hair) दाट, मुलायम, काळे लांब असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण काही वेळा केस ड्राय होणं, अवेळी केस पांढरे होणं, अश्या समस्या जाणवू लागतात. यासाठी काय करता येईल असा प्रश्न अनेकांना समोर असतो. त्यावर काही घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास तुमचे केस काळे होतील. असाच एक उपाय आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ज्यामुळे तुमचे केस काळे तर होतीलच शिवाय त्यांना शाईनही येईल. केसांच्या वाढीसाठीही हा उपाय खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. हा प्रभावी उपाय आहे पेरूच्या पानांचा (Guava Leaves)… पेरूची पाने केसांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे तुमचे केस अधिक मऊ होतील.

पेरूच्या पानांचे पाणीही केसांसाठी उपयुक्त (hair tips) आहे. पेरूची काही पाने धुवून घ्या. आता त्यांना एक लिटर पाण्यात उकळवा. 15 ते 20 मिनिटे उकळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळून बाटलीत काढा. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. सुकल्यानंतर स्प्रेच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. 10 मिनिटे मसाज करा. पुढील काही तास केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

पेरूच्या पानांचा हेअर पॅक

पेरूच्या पानांपासून हेअर पॅक बनवून तो वापरला तर केसांसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी 15 ते 20 पेरूची पाने धुवून वाळवा. मिक्सरमध्ये पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट भांड्यात काढा.यानंतर केसांच्या केसांना लावा.काहीवेळ डोक्याचा मसाज करा. आता हेअरबँडच्या मदतीने केस बांधा आणि 30-40 मिनिटे राहू द्या.ते सुकल्यावर साध्या पाण्याने धुवावे. शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा हेअर पॅक लावल्यास केसांसाठी हे फायदेशीर आहे.


हेही वाचा :


आता 28 नव्हे 31 दिवसांचा मिळणार रिचार्ज


राज ठाकरे सरड्यासरखे रंग बदलतात, त्यांना नकलेशिवाय काय येतं?


दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी…


हृतिक रोशनच्या नव्या लूकवर गर्लफ्रेंड फिदा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *