जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्यांना प्रोटीन पावडरची गरज असते का?

काही लोकांना बॉडी बिल्डिंग (lean muscle) करण्याची आवड असते आणि त्यासाठी ते प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्स वापरतात. तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन पावडरचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. या बाबतीत निष्काळजीपणा करणं आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं.

तुम्ही जर जिममध्ये प्रोटीन पावडरही घेत असाल किंवा त्याबाबत प्लॅनिंग (lean muscle) करत असाल तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू  शकता.

फिटनेस तज्ज्ञ काय म्हणतात?
आरोग्य आणि फिटनेस प्रशिक्षक अरुण सिंह News 18 हिंदीला दिलेल्या माहितीत म्हणतात की, सर्व लोकांना नैसर्गिक पद्धतीने प्रोटीनची मात्रा पूर्ण करण्याचा सल्ला व्यायामशाळेत दिला जातो. स्नायूंचं वस्तुमान राखण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला प्रति किलोग्रॅम वजनासाठी 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. जे लोक त्यांच्या आहारात अंडी, मांस, चीज, मासे, चिकन, दूध, दही आणि फळांचा समावेश करतात, त्यांना गरजेनुसार प्रोटीन मिळतं. ज्या लोकांना नैसर्गिकरित्या प्रथिने मिळू शकत नाहीत, त्यांना कधीकधी प्रोटीन पावडर वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रोटीन पावडर अत्यंत सावधगिरीने खरेदी करावी. बाजारात उपलब्ध असलेली सर्वच उत्पादनं आरोग्यासाठी चांगली असू शकत नाहीत.

अशा लोकांनी प्रोटीन पावडर घेऊ नये –
अरुण सिंह म्हणतात की, ज्या लोकांना यकृताच्या समस्या आहेत त्यांना प्रोटीन पावडर घेण्याचा सल्ला दिला जात नाही. याशिवाय किडनी आणि इतर अंतर्गत आजार असलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट घेण्यास मनाई आहे. फिटनेस प्रशिक्षक म्हणतात की, डॉक्टर कधीही प्रोटीन पावडरचा सल्ला देत नाहीत. जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. अशा लोकांनी योग्य प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार जिम करावी.

चांगला आहार घेणं खूप महत्त्वाचं –
फिटनेस कोचच्या मते, सर्व लोकांनी जिम करताना हेल्दी डाएट  घेतला पाहिजे. त्यासोबतच योग्य व्यायाम केला तर कोणतंही सप्लिमेंट घेण्याची गरज भासणार नाही. तसंच, बाजारात मिळणारे कोणतेही सप्लिमेंट्स योग्य प्रमाणात घेणं आवश्यक असतं. अन्यथा, प्राणघातक परिणामांनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे बॉडी बिल्डिंग अत्यंत सावधगिरीने करायला हवी.

Smart News :


हिंदू वेशात मुस्लीम तरुणांकडून 3 दर्ग्यांमध्ये तोडफोड; वातावरण बिघडवण्यासाठी रचला मोठा कट

Leave a Reply

Your email address will not be published.