‘या’ २ चुकांमुळे गळतात केस! जाणून घ्या Hair Washing ची योग्य पद्धत

natural hair growth tips

केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळायला वेळ लागत नाही. केसांचे (natural hair growth tips) सौंदर्य जितके त्याच्या अंतर्गत पोषणावर अवलंबून असते तितकीच त्याची बाहेरूनही काळजी घेतली पाहिजे. आपण सगळेच केस धुतो आणि ऐकल्यावर वाटतं की त्यात काय मोठं काम आहे.

केस धुताना होणारी सर्वात सामान्य आणि मोठी चूक म्हणजे केसांना  (natural hair growth tips) योग्य प्रकारे शॅम्पू न लावणे. बहुतेक लोक केस धुताना सर्व केसांवर शॅम्पू लावतात, खरतर शॅम्पू केसांच्या मुळांनाच लावावा. केसांची मुळे तेलकट असतात परंतु केसांची टोके कोरडी असतात, त्यामुळे केसांवर शॅम्पू घासल्याने ते अधिक कोरडे होतात. त्यामुळे शॅम्पू फक्त केसांच्या मुळांना लावावा, जेणेकरून केसांवर पाणी टाकताच शॅम्पूची पुरेशी मात्रा पाण्यासह उर्वरित भागात पोहोचेल.

केसांना चुकीच्या पद्धतीने कंडिशनर लावणे ही देखील एक समस्या आहे. कंडिशनर लावताना अनेकजण केसांच्या मुळांमध्ये म्हणजेच टाळूवरही कंडिशनर लावतात. कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर लावावे, टाळूला लागू नये. कंडिशनर टाळूला तेलकट बनवते, तसेच ते टाळूचे रॉम छिद्र बंद करू शकते, ज्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.


हेही वाचा :


याचा फायदा होणार नाही, रोहित शर्माचा दावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *