चष्म्यामुळे नाकावर पडणारे डाग घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

डोळ्यांनी जवळचे किंवा लांबचे दिसण्यामध्ये काही अडचण येत असेल तर आपल्याला चष्मा वापरावा लागतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या लेन्सचा चष्मा (spectical) घातला नाही तर डोळे आणखी खराब होऊ शकतात. नंतर मग चष्म्याशिवाय काहीही दिसणार नाही, अशी स्थिती होऊ शकते. लॅपटॉप, मोबाईल, टीव्हीवर जास्त वेळ डोळे लावून बसणे, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता, डोळ्यांचा व्यायाम, काळजी न घेणे, डोळ्यांना विश्रांती न देणे अशा सवयींमुळे अनेकदा लोकांचे डोळे कमकुवत होऊ लागतात.
आता तर लहान वयातच मुलांना चष्मा लागतो. चष्म्याच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे सतत चष्मा लावल्यामुळे डोळ्यांजवळ काळे डाग पडतात, ते चेहऱ्यावर कुरूप दिसतात.
वास्तविक, चष्म्यावरील (spectical) नाकाचा स्टँड आपल्या नाकावर राहतो. स्टँडमुळे नाकाच्या त्वचेवर सतत दबाव पडतो, ज्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण देखील थांबते. त्यामुळे तेथील त्वचा मृत होते. जेव्हा तुम्ही सतत चष्मा लावता तेव्हा नाकाच्या त्या भागाच्या दोन्ही बाजूला काळे डाग (Spectacle Marks) पडतात. ते कुरूप दिसते आणि जर उपाय केले नाहीत तर चट्टे लवकर निघून जात नाहीत.
ज्या ठिकाणी डाग असेल त्या ठिकाणी कोरफडीचे जेल लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. बोटांनी थोडा मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा. कोरफडीमध्ये असलेले अँटी-एजिंग घटक चट्टे, जळजळ कमी करतात.
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात काकडी खा आणि चष्म्यामुळे पडलेले डाग कमी करण्यासाठीही वापरा. काकडीचे लहान तुकडे कापून अशा डागांवर ठेवा किंवा पेस्ट बनवा आणि लावा. 10 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. डाग पडलेल्या त्वचेला यामुळे थंडावा मिळतो. यामध्ये व्हिटॅमिन के असते, ज्यामुळे त्वचेला चमक येते, डाग कमी होतात.
लिंबाचा रस लावल्यानं त्वचेशी संबंधित समस्या कमी करता येतात. चष्म्यामुळे पडलेल्या डागांवर लिंबाचा रस लावा आणि 10 मिनिटे राहु द्या. आता ते पाण्याने स्वच्छ करा. लिंबाच्या रसामध्ये असलेले ब्लीचिंग गुणधर्म डाग कमी करतात आणि चेहरा उजळतात.
याशिवाय तुम्ही गुलाबपाणी, मध, टोमॅटोचा रस, बदामाचे तेल, संत्र्याच्या सालीपासून तयार केलेली पावडर, सफरचंद सायडर व्हिनेगर इत्यादी गोष्टींचा वापर करून चष्म्यांमुळे पडलेले डाग नाहीसे करू शकता.
हेही वाचा :