उन्हामुळं काळ्या पडलेल्या मानेचा उजळेल रंग, करा हे उपाय

हळद आणि बेसन – बेसन त्वचेला एक्सफोलीएट (Exfoliate) करतं. त्यामुळे त्वचा तजेलदार होते. बेसनाने त्वचेच्या (beauty tips) रोमन छिद्रांमध्ये साठलेली घाण देखील निघून जाते. 2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
बेकिंग सोडा – बेकिंग सोड्यामधील घटक काळी पडलेली मान स्वच्छ करण्यामध्ये अतिशय फायदेशीर आहेत. 1 चमचा पाण्यामध्ये 2 चमचा बेकिंग सोडा मिसळा याची पेस्ट आपल्या मानेवर लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे वापरल्यास आपली मान गोरी होईल.
बटाटा – बटाट्यामध्ये ब्लीचिंग घटक असतात. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते. याशिवाय पिंपल्स कमी (beauty tips) होतात. बटाट्याचा लगदा तयार करून त्याचा रस काढा. कापसाच्या बोळ्यावर घेऊन काळ्या भागावर लावा. पूर्णपणे सुकल्यानंतर धुऊन टाका.
मध आणि टोमॅटो – मध, टोमॅटोचा रस, लिंबाचा रस एकत्र करून ही पेस्ट आपल्या मानेवर लावा. 20 मिनिटांनी सुकल्यानंतर धुऊन टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर केल्यास फरक नक्की जाणवेल.
हेही वाचा :