जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, या आरोग्य समस्या होतील दूर!

दिवसभराची धावपळ, ताण (Stress) आणि थकवा यामुळे आपण सर्वंचजण रात्री कंटाळतात. दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरुणावर झोपण्याचा एक खास आनंद असतो. लोक त्यांच्या सोयीनुसार बेड (health tips) तयार करतात. काहीजण पातळ गादीवर झोपणे पसंत करतात, तर काही लोकांना जाड गादीवर झोपणे आवडते.
अनेक वेळा पाठदुखीमुळे (Back pain) काही लोक पातळ गादी बनवतात. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तज्ञांच्या मते 8 तासांची झोप पूर्ण करण्यासाठी झोपेसंदर्भात काही टिप्स फाॅलो (Follow) करणे अत्यंत महत्वाचे आहे. बेड आणि गादीवर झोपण्याऐवजी कधीही जमिनीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
रक्ताभिसरण
शरीरातील रक्ताभिसरण बरोबर असेल तर स्नायूंना आराम मिळतो. तज्ज्ञांच्या मते जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूला आराम मिळतो. म्हणूनच तुम्हीही रोज जमिनीवर झोपायला सुरुवात करा, सुरुवातीचे काही दिवस त्रास होईल. पण एकदा का तुम्हाला याची सवय झाली की तुमच्या शरीराचे सर्व आजार दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.
पाठीचा कणा मजबूत होतो
थकवा आणि एकाच जागी काम करत बसण्यामुळे आजकाल बहुतेकांना मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. यासाठी ते महागडी औषधे आणि व्यायामही करतात, पण विश्रांती मिळत नाही, खरे तर गादीवर झोपल्याने मणक्याला जड जाते आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ही समस्या दूर करण्यासाठी महागड्या गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपायला सुरुवात करा. असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. (health tips)
ताण
बऱ्याच लोकांना लवकर झोप लागत नाही. यामागचे कारण तणाव असू शकते. तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. मन शांत करण्यासाठी जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. जमिनीवर झोपल्याने मिळणारी शांती मनातील तणाव दूर करते. यामुळे कधीही जमिनीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
हेही वाचा :