हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या 4 गोष्टी…

हृदयविकाराचा (heart attack) धोका वाढवण्यासाठी अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यापासून आपण वेळीच अंतर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, हे नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, अन्यथा हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे. हृदयरोगींना उच्च रक्तदाब असतो, कोलेस्टेरॉल वाढते, हृदयाचे ठोके जलद आणि मंद असतात. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढू शकतात. जाणून घेऊया अशा चार गोष्टी, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कायम राहतो.

1. जास्त मीठ नको –

तुम्हीही भरपूर मीठ खात असाल तर ही सवय बदला, कारण जास्त मीठ तुमच्या (heart attack) हृदयासाठी अजिबात चांगले नाही. वेगवेगळ्या पदार्थांमधून जास्त मीठ खाल्ले गेल्याने रक्तदाब वाढू शकतो हे लक्षात ठेवा. यासाठीच फास्ट फूड आणि बाहेरील पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. फास्ट फूड पदार्थांमध्ये मिठाचा जास्त वापर होतो.

2. गोड खाणे –

यासोबतच जास्त साखर खाणे देखील हृदयासाठी चांगले नाही. कारण जास्त साखर खाल्ल्याने शरीराला इन्सुलिन वापरता येत नाही. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही कायम राहतो. गोड पदार्थांमधून आपल्या पोटात जास्त साखर जाते, हे आपल्या लक्षात येत नाही. बाहेर मिळणाऱ्या गोड पदार्थांमध्ये साखरेबरोबरच आणखी काही वाईट घटक असतात.

3. अंड्यातील पिवळा बलक –

अंड्यातील पिवळा बलकदेखील मर्यादित प्रमाणात खायला हवा. अनेक आरोग्य तज्ज्ञ पिवळा बलक न खाण्याचा सल्ला देतात. कारण अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे अंडीही मर्यादित प्रमाणात खावीत.

4. मैदा नको –

मैदा तुमच्या शरीरासाठी कोणत्याही परिस्थितीत चांगला नाही. विशेषत: हृदयाच्या रुग्णांसाठी हा खूप धोकादायक आहे. मैद्याचे पदार्थ खात राहिल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

हेही वाचा :


शरद पवारांना तिसरं समन्स..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *