शरीराला कसा प्रभावित करतो Diabetes, किडनी, हृदय आणि मेंदूवर करतो असा परिणाम.

Diabetes

पोलीसनामा ऑनलाइन टीम – असे मानले जाते की मधुमेहाच्या (Diabetes) समस्येचा सर्वात जास्त परिणाम किडनीवर (Kidney) होतो. पण सत्य हे आहे की हा आजार फक्त किडनीवरच परिणाम करत नाही तर हृदय (Heart) आणि मेंदूसाठीही (Brain) खूप हानिकारक आहे.

एखाद्या रोगामुळे, इतर काही आरोग्य समस्या (Health Problems) देखील रुग्णाला त्रास देऊ लागतात, अशा रोगांना शॅडो डिसीज (Shadow Disease) म्हणतात. मधुमेह (Diabetes) हा देखील असाच एक आजार आहे ज्यामुळे इतर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. मधुमेहाचा शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घेवूयात. (Effects of Diabetes on Your Body)

1. हृदयाला मधुमेहाचा धोका 
मधुमेहाच्या (Diabetes) सुमारे 70 टक्के प्रकरणांमध्ये लोक लठ्ठपणा, रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या (Obesity, High Blood Pressure, High Cholesterol) समस्यांनी ग्रस्त आहेत. अशा रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते, त्यामुळे त्या हळूहळू अरुंद होतात आणि त्यामुळे रक्ताभिसरणात (Blood Circulation) अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते, अशा प्रकारे शरीरातील हा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजेच हृदय कमकुवत (Heart Weak) होऊ लागते. या कारणांमुळे हार्ट फेल्युअर (Heart Failure), आर्टरी ब्लॉकेज ( Artery Blockage) आणि हार्ट अटॅक (Heart Attack) यासारख्या समस्या उद्भवतात.

2. मेंदूला हानिकारक 
मधुमेहामुळे ज्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल (Cholesterol) किंवा इतर हानिकारक पदार्थ (Harmful Substance) जमा होऊ लागतात, त्याचप्रमाणे मधुमेहामुळे मेंदूच्या नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) देखील होऊ शकतो. त्याच वेळी, यामुळे स्मरणशक्ती (Memory) कमी होण्याचा धोका देखील असतो.

शुगरचे रुग्ण आहारावर नियंत्रण ठेवतात आणि शुगर लेव्हल (Sugar Level) कमी ठेवण्यासाठी औषधाचीही मदत घेत
असल्याने काही वेळा त्यांची शुगर लेव्हल अचानक खूप कमी होते, त्यामुळे रुग्ण बेशुद्धही होतो, काही वेळा रुग्ण कोमातही जाऊ शकतो.

3. किडनीवर परिणाम
किडनी आपल्या शरीरात फिल्टरसारखे काम करते, रक्त फिल्टर करून स्वच्छ करते.
मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढल्याने किडनीच्या बारीक रक्तवाहिन्या नलिकेला हळूहळू खराब करतात,
त्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते.
किडनीचे बहुतांश रुग्ण हे मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patients) असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

Smart News:-

सोमय्या येताच दापोलीत जमावबंदी लागू, पोलीस स्थानकातच निलेश राणेंचा राडा!


IPL: कोलकाताने नाणेफेक जिंकली, तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी देताना चेन्नईची डोकेदुखी वाढवली


२ तरुणावर केला २० ते २५ जणांच्या टोळक्याने हल्ला,पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *