उन्हाळ्यापासून स्वतःचे सरंक्षण कसे कराल?; या टिप्स लक्षात ठेवा

summer season

शहरासह राज्यात आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. यंदा उन्हाळा(summer season) लवकर आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यात काही ठिकाणी पाऱ्याने चाळिशी पार केली होती. पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने ऐन उन्हाळ्यात विविध आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकतज्ज्ञांनी उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

उन्हाळ्यात((summer season) घ्यायची काळजी

– पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबूपाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ घ्या.

– पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा.

– डोक्यावर टोपी घाला.

– घराबाहेरील कामे सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी चारनंतर करा.

हे टाळा

– उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा.

– दुपारी १२ ते चार या वेळेत घराबाहेर जाऊ नये.

– चप्पल न घालता किंवा अनवाणी उन्हात चालू नये.

-मद्य, खूप साखर असलेली चहा, कॉफी आणि कॉर्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळा.

उष्माघातानंतर करायचे प्रथमोपचार

– पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून व्यक्तीला झोपायला सांगावे.

– त्रास झालेल्या मुलाला किंवा मुलीला तातडीने सावलीच्या ठिकाणी आणावे.

– मूल जागे असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत.

– हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.

– उलटी होत असल्यास एका कुशीवर वळवावे. असे केल्याने गुदमरून जायला होत नाही.

– मूल बेशुद्ध असल्यास खायला किंवा प्यायला देऊ नये.

लहान मुलांसाठी काय काळजी घ्याल?

– लहान मुलांना उन्हामुळे तहान लागल्यास पाणी न देता साखर-मीठ-लिंबू पाणी द्यावे.
– कोकम सरबत, नारळाचे पाणी द्यावे.

– मुले जागी असताना एका तासात १०० मिली एवढे पाणी पितील याबाबत दक्ष राहावे. पाण्याची बाटली मुलांजवळ ठेवावी.

– मुले बाहेर असताना त्यांच्या आहाराबाबत काळजी घ्यावी.

– प्रवासात घरचे अन्न खावे.

सध्या उन्हाळ्यामुळे उलट्या, जुलाबांचा त्रास होऊ नये यासाठी लहान मुलांना साखर आणि मीठ घालून पाणी द्यायला हवे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना फ्लू प्रतिबंधक; तसेच विषमज्वर आणि रोटाव्हायरस प्रतिबंधक लस घेण्याची शिफारस भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेने केली आहे.

हेही वाचा:


इचलकरंजीमध्ये लूट करणार्‍या तिघांचा पर्दाफाश..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *